चीनकडून गेल्या चार-पाच दिवसात चाळीस हजार तीनशे सायबर हल्ले!
गेल्या चार पाच दिवसांमध्ये इंडियाच्या सायबरवर चायनाकडून जवळपास 40 हजार तीनशे सायबर अटॅक केले गेले आहेत. ज्या हल्यामुळे देशाच्या पायाभूत सुविधा, माहिती आणि बँकिंग क्षेत्रावर त्याचा परिणाम होणार असल्याचे महाराष्ट्र सायबर सेलने सांगितले आहेत.
औरंगाबाद : चीनच्या कुरापती काही थांबायच्या नाव घेताना दिसत नाही. भारत-चीन सीमेवरील झटापटीनंतर चीनने भारताविरुद्ध नवे हत्यार उपसले आहे. ते म्हणजे, सायबर अॅटकचे. सिमाभागात घुसखोरी करणारा चीन आता संगणकाद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने आता इंटरनेटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सरकारी वेबसाईट हॅक करण्याचा आणि जनतेचा डेटा चोरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याबद्दलची अॅडव्हायझरी महाराष्ट्र सायबर विभागाकडून जारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सायबर सेलला मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार पाच दिवसांमध्ये इंडियाच्या सायबरवर चायनाकडून सायबर अटॅक केले गेले आहेत. ज्या हल्यामुळे देशाच्या पायाभूत सुविधा, माहिती आणि बँकिंग क्षेत्रावर त्याचा परिणाम होईल. हे सायबर आणि हॅकिंग अटॅक चायनाच्या चंडू भागातून करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे स्पेशल आयजी यशस्वी यादव यांनी दिली आहे.
पाहा व्हिडीओ : चीनकडून गेल्या 4-5 दिवसांपासून भारतावर सायबर अटॅक
देशात गेल्या चार-पाच दिवसात चाळीस हजार तीनशे अटॅक केले गेले आहेत. हे सर्व हल्ले चायनाच्या चंडू एरियातून हे जनरेट होत आहेत. चिनी हॅकर्स कडून मुख्यतः तीन प्रकारे अटॅक केले जात आहेत. एक म्हणजे, डिनायल ऑफ सर्व्हिस अॅटक. दुसरा इंटरनेट प्रोटोकॉल हायजॅकिंग अटॅक आणि तिसरा फिशिंग अॅटॅक. या तीनही अटॅकचा परिणाम गव्हर्मेंट सेक्टरवर झाल्याची माहिती महाराष्ट्र सायबर सेलचे स्पेशल आयजी यशस्वी यादव यांनी दिली आहे. कोणत्या प्रकारचे सायबर हल्ले चायना करते आहे ते पाहुयात...
DoS म्हणजेच डिनायल ऑफ सर्विस सायबर अटॅक आहे. इंटरनेटच्या जगतामध्ये कोणत्याही सर्व्हर वेबसाईटवर केला जाणारा हा असा अटॅक आहे, जो कोणत्याही सर्व्हरला अथवा वेबसाईटला डाऊनलोड करतो. अन्यथा वेबसाईट बंद केली जाते. त्या वेबसाईट युजर्ससाठी ती वेबसाईट अन अव्हेलेबल केली जाते. मग कोणीही युजर त्या वेबसाईटपर्यंत पोहोचू शकत नाही आणि हे सगळं करण्यासाठी हॅकरची पूर्ण टीम यामागे असते.
डिनायल ऑफ सर्व्हिस अॅटकचा हॅकर्सना काय फायदा होतो?
डिनायल ऑफ सर्व्हिस अॅटक करण्याच्या पाठीमागे हॅकरचा काय हेतू असतो. अशा प्रकारचा अटॅक करण्यामागे मुख्य हेतू असतो तो म्हणजे, पैसे कमावणे किंवा कॉम्पिटिशन करण्यासाठीही असा हल्ला केला जातो. याबरोबरच याचा मुख्य हेतू कोणाचा बदला घेण्यासाठीही असतो. अशा प्रकारचे अटॅक केले जातात. जसे एखादी वेबसाईट हॅक केल्यानंतर ती उघडत नाही. हॅकर त्या वेबसाईट ओनरकडे पैसे मागतो त्यानंतर ती वेबसाईट अप करतो किंवा सुरु करतो. याचबरोबर कोणाचा बदला घ्यायचा असेल तरीदेखील अशा प्रकारचा सायबर अटॅक केला जातो.
प्रोटोकॉल हायजॅकिंग अटॅक
प्रोटोकॉल हायजॅकिंग अटॅक या अटॅकमध्ये समोरच्या व्यक्तीचे नेटवर्क आणि कम्प्युटर कॉम्प्रोमाइज करून त्या वर होणाऱ्या महत्वाच्या अॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवून ठराविक वेळी हॅकर्स त्या युजर्सच्या घडामोडी कंट्रोल करत असतो. विशेष करून आर्थिक म्हणजेच नेटबँकिंग, युपीआय या गोष्टींना प्रभावित करू शकतात. तसेच समजा हा प्रकार आपल्या मोबाईलवर झाल्यास जीपीएस लोकेशन, फोटो आणि इतर माहिती लीक होऊ शकते. तसेच त्या मोबाईल किंवा कम्प्युटरचे नियंत्रण काही प्रमाणात हॅकरस स्वतः कडे घेतात.
फिशिंग अॅटॅक
फिशिंग अॅटॅकमध्ये हॅकर्स हे प्रसिद्ध अशा वेबसाईट जसे फेसबुक, ट्विटर अथवा नेटबँकिंगसारख्या हुबेहूब खोट्या वेबसाईट तयार करून विविध पध्दतीने टार्गेट व्यक्तींना पाठवल्या जातात.सर्व सामान्य माणसं आशा प्रकारच्या गोष्टींना बळी पडतात आणि त्या वेबसाईटमध्ये आपली माहिती जसे युजर आयडी, पासवर्ड, नेटबँकिंग डिटेल्स इत्यादी गोष्टिंचा समावेश असतो. भारतात पर्यायाने ही माहिती खऱ्या वेबसाईटकडे न जाता हॅकर्सकडे जाते. ज्यामुळे सदरील व्यक्तींना मनस्ताप होऊ शकतो.
अशा प्रकारे बचाव करावा :
औरंगाबादेतील सायबर सेक्युरिटी एक्सपर्ट यांनी सायबर अटॅकपासून बचाव करण्यासाठी काही उपाय आणि सुचना दिल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे,
1. स्वतः चे इंटरनेट आणि कम्प्युटर वापरावे ते वापरत असताना योग्य अॅन्टीव्हायरस आणि अपडेट करावा. वापर करण्याआधी स्कॅन करून मगच वापरावे. 2. अनोळखी ठिकाणी/ व्यक्तींना इंटरनेट आणि कम्प्युटर/मोबाईल वापरू देऊ नका. तसेच अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. 3. आपला फोन अपरिचित वाटणारी गोष्ट करत असेल जसे वारंवार गरम आहेत असेल, रिस्टार्ट होत असेल तर सायबर एक्सपर्टकडे जाऊन सल्ला घ्यावा.
महत्त्वाच्या बातम्या :
सावधान! सायबर हल्ल्याद्वारे चीनचा महाराष्ट्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न
सावधान! भारतावर चीन सायबर हल्ला करण्याची शक्यता! अनोळखी ईमेल उघडू नका