एक्स्प्लोर

सावधान! सायबर हल्ल्याद्वारे चीनचा महाराष्ट्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न

बँकिंग आणि इन्फॉर्मेशन सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात सायबर अटॅक पाहायला मिळाला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये 40 हजार पेक्षाही जास्त सायबर अटॅक या सेक्टरमध्ये करण्यात आल्याचं सायबर विभागाच्या निदर्शनास आलं आहे.

मुंबई : भारत-चीन सीमेवरील झटापटीनंतर चीनने आता भारताविरुद्ध नवे हत्यार उपसले आहे. हे हत्यार आहे सायबर अ‍ॅटकचे. सीमाभागात घुसखोरी करणारा चीन आता संगणकाद्वारे भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने आता इंटरनेटच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सरकारी वेबसाईट हॅक करण्याचा आणि जनतेचा डेटा चोरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याबद्दलची अॅडव्हायझरी महाराष्ट्र सायबर विभागाकडून जारी करण्यात आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या सायबर सिस्टीममध्ये चीनची घुसखोरी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. विशेष करुन इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग आणि इन्फॉर्मेशन सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात सायबर अटॅक पाहायला मिळाला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये 40 हजार पेक्षाही जास्त सायबर अटॅक या सेक्टरमध्ये करण्यात आल्याचं सायबर विभागाच्या निदर्शनास आलं आहे. चिनी हॅकर्स कडून मुख्यतः तीन प्रकारे अटॅक केले जात आहेत. डिनायल ऑफ सर्व्हिस अॅटक इंटरनेट प्रोटोकॉल हायजॅकिंग अटॅक, फिशिंग अॅटक. अशा प्रकारे सायबर हल्ले करुन चिनी हॅकर्स अत्यंत महत्त्वाचा डेटा चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. सायबर हल्ला कसा केला जाऊ शकतो? तुम्हाला आकर्षित करणारा/आर्थिक प्रलोभन देणारा विषय [Email Subject] असलेला इमेल पाठवला जाईल. जसे की Free Covid Test, Free Covid-19Kit. त्या इमेलमध्ये काही लिंक क्लिक करण्यासाठी किंवा अटॅचमेंट डाउनलोड करण्यासाठी सांगितले असेल. हा खोटा इमेल covid2019@gov.in/ncov2019.gov.in अशा प्रकारच्या खोट्या सरकारी इमेलवरून पाठवल्याचे भासवले जाऊ शकते. महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की वर माहिती दिल्याप्रमाणे या प्रकारच्या कोणत्याही ईमेलला प्रतिसाद देऊ नका आणि covid2019@gov.in/ncov2019.gov.in या ईमेल आयडीने जर तुम्हाला कोणताही मेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करू नका किंवा कोणताही रिप्लाय या मेलवर देऊ नका. या हॅकर्सपासून वाचण्यासाठी नेमकं काय करावं? सायबर सुरक्षा संगणक आणि मोबाईलसाठी एक चांगला, अपडेटेड आणि अधिकृत [Paid/Licensed] अँन्टी व्हायरस वापरावा. संगणकातील सॉफ्टवेअर आणि मोबाईल मधील अॅप नियमितपणे अपडेट करा. कठीण आणि मोठे पासवर्ड ठेवा. आणि ते नियमितपणे बदलत राहा. तुमच्या महत्वाच्या माहितीचा नियमित बॅकअप घ्या. प्रलोभने देणारे संशयास्पद इमेल उघडू नये. त्यातील लिंकवर क्लिक करू नये. त्यातील अटॅचमेंट डाउनलोड करू नये आणि उघडू नये. खोट्या आणि प्रलोभने देणाऱ्या इमेल आणि वेबसाईटपासून सावध राहा. असुरक्षित आणि संशयास्पद वेबसाईटवर तुमची महत्वाची माहिती जसे की युजर नेम, पासवर्ड, कार्ड नंबर, पिन नंबर, ओटीपी तसेच इतर गोपनीय माहिती टाकू नका. महाराष्ट्र सायबर सेलचे आयजी यशस्वी यादव यांनी लोकांना आवाहन केलं आहे, की अशा मेलपासून त्यांनी सावध रहावं आणि अशा हॅकर्सला बळी पडू नये. तसेच योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना महाराष्ट्र सायबर सेलकडून करण्यात आले आहे. China Cyber Attack | ईमेलद्वारे आलेली संशयित अटॅचमेंट उघडू नका, चीन भारतावर सायबर अटॅकच्या तयारीत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget