एक्स्प्लोर
कुख्यात गुंड गुड्ड्या हत्याप्रकरण, एका संशयिताला अटक
शहरातील कुख्यात गुंड गुड्ड्याची मंगळवार (18 जुलै रोजी) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. सागर साहेबराव पवार असं या आरोपीचं नाव आहे.

फाईल फोटो
धुळे : शहरातील कुख्यात गुंड गुड्ड्याची मंगळवार (18 जुलै रोजी) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. सागर साहेबराव पवार असं या आरोपीचं नाव आहे.
मंगळवारी पहाट साडे पाच ते सहाच्या सुमारास कुख्यात गुंड गड्ड्याची कराचीवाला चौकात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही हत्या टोळी युद्धातून झाल्याचं बोललं जात होतं. याप्रकरणी गोयर आणि देवरे गटातील 11 जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आता यातील प्रमुख आरोपी सागर साहेबराव पवारला पोलिसांनी अटक केली आहे. पवारला कामशेतमधून अटक करण्यात आली. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
गुड्ड्यावर धुळ्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच गुड्ड्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. पण मंगळवारी पहाटे त्याचा गोळ्या झाडून त्याची हत्या झाली.
संबंधित बातम्या
धुळ्यात कुख्यात गुंडाचा गोळ्या झाडून खून
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
नांदेड
विश्व
Advertisement
Advertisement




















