Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी 25 हजार 425 कोरोनाबाधितांची नोंद तर 42 जणांचा मृत्यू
Maharashtra Corona Update : राज्यात आज 42 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.86 टक्के झाला आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 25 हजार 425 नव्या रुग्णांची भर पडली असून 42 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 36 हजार 708 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 72 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 72 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 2930 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 1592 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 42 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 42 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.86 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 71 लाख 97 हजार 001 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के आहे. सध्या राज्यात 15 लाख 31 हजार 108 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3259 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 40 लाख 12 हजार 958 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत गुरुवारी 1 हजार 384 नवे कोरोनाबाधित
मागील 24 तासांत मुंबई 1 हजार 384 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. कालच्या तुलनेत रुग्णसंख्या काही प्रमाणात आणखी कमी झाली आहे. मुंबईत सद्यस्थितीला 18 हजार 40 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत गुरुवारी 1 हजार 384 नवे रुग्ण आढळले असून 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 581 झाली आहे. तर मागील 24 तासांत तब्बल 5 हजार 686 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे.
इतर बातम्या :
- Coronavirus Mask Free : राज्य होणार 'मास्कमुक्त? टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण जाहीर होणार
- सर्वसाधारण औषधांप्रमाणे Covishield आणि Covaxin लसी आता खुल्या बाजारात मिळणार, DCGI ची परवानगी
- Covid 19 Cases in India : भारत कोरोनामुक्त कधी होणार? तज्ज्ञांनी सांगितली महत्वाची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha