एक्स्प्लोर
गुढीपाडव्या दिवशी प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या, बार्शीत खळबळ
मागील दहा दिवसांपासून पोलीस आणि कुटुंबीय या दोघांचा शोध घेत होते. यामध्ये मृत प्रेयसी ही अल्पवयीन होती. त्यामुळे पोस्को कायद्यांतर्गत प्रियकरावर अपहरणाचा गुन्हा देखील दाखल झाला होता.

सोलापूर : गुढीपाडव्याच्या मंगलदिनी प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास बार्शीतील राऊत तलावाच्या पाठीमागील भागात असलेल्या झाडाला या प्रेमीयुगुलांनी गळफास घेतला. त्यांच्या प्रेमाला घरातून विरोध असल्याने मागील 10 दिवसापासून दोघेही घरातून बेपत्ता होते. मागील दहा दिवसांपासून पोलीस आणि कुटुंबीय या दोघांचा शोध घेत होते. यामध्ये मृत प्रेयसी ही अल्पवयीन होती. त्यामुळे पोस्को कायद्यांतर्गत प्रियकरावर अपहरणाचा गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतर घरातील होणाऱ्या विरोधामुळे अल्पवयीन प्रेयसी आणि सज्ञान प्रियकराने आपले जीवन संपवल्याचे बोलले जात आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी अशी घटना घडल्यामुळे संपूर्ण बार्शी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























