एक्स्प्लोर

Coronavirus In India : कोविड पुन्हा डोकं वर काढतोय का? केंद्र सरकार अलर्ट मोडवर, राज्यांना दिल्या सूचना

Coronavirus In India : केरळमध्ये बुधवार 19 डिसेंबर रोजी 292 रुग्णांची नोंद झाली असून 3 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्याचप्रमाणे राज्यात देखील 35 सक्रिया रुग्ण आहेत.

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव वाढतोय का? असा प्रश्न सध्या निर्माण झालाय.  त्याचं कारण म्हणजे मागील काही दिवसांत राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. रुग्णांची संख्या जरी मोठी नसली तरी नव्या व्हेरीयंटचा (JN1 Varient) अनेकांनी धसका घेतल्याचं दिसत आहे. केरळात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. त्याचप्रमाणे राज्यात सध्या 45 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातच आज एकूण 14 रुग्णांचे निदान झाले आहे.  याचं प्रमुख कारण म्हणजे जेएन1 हा नव्याने आलेला व्हेरीयंट असल्याचं बोललं जात आहे. यासंबंधी केंद्राकडून राज्यातील आरोग्य मंत्र्यांची बैठक घेण्यात आली असून घाबरण्याचं कारण नसलं तरी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

 केरळमध्ये बुधवार 19 डिसेंबर रोजी 292 रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्याचबरोबर राज्यात सध्या 45 सक्रिय रुग्ण आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नागरिकांना देखील काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

केरळमध्ये सर्वाधिक रुग्णांच्या नोंदी

देशात एका दिवसात आढळलेल्या 341 रुग्णांपैकी 292 रुग्ण हे एकट्या केरळ राज्यात सापडल्याची नोंद झालीये. केरळ, दिल्ली, गोवा, गुजरात आणि कर्नाटकात वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून बैठक देखील घेण्यात आली. या बैठकीमध्ये केंद्राकडून राज्यांना अलर्ट मोडवर राहण्यास सांगितले आहे. रुग्णालयाची तयारी, देखरेख आणि मॉक ड्रिलसह तयार राहण्याच्या सूचना राज्यांना देण्यात आल्यात. राज्यातही बुधवार 8 डिसेंबर रोजी 11 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यामधील 8 रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. 

कोरोनाचा नवा जेएन1 व्हेरीयंट घातक जरी नसला तरी काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आलंय. कर्नाटकात 60 वर्षांवरील ज्येष्ठांना मास्क लावण्याचा सल्ला देखील देण्यात आलाय. मागील दोन आठवड्यांपासून राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. मात्र, त्याची संख्या मोठी नसल्याचं आणि आरोग्य यंत्रणा त्याआधी सज्ज असल्यानं दिलासादायक म्हणावं लागेल. 

गेल्या काही वर्षांपासून जगाची झोप उडवणाऱ्या कोरोना व्हायरसनं (Coronavirus Updates) पुन्हा एकदा धाकधूक वाढवली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि कोरोनाच्या (Covid-19) संसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविडचा नवा सबव्हेरियंट (New Subvariant of Covid) भारतात (India Corona Update) आल्याचं समोर आलं आहे. कोविड-19 चा सबव्हेरियंट JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये (Kerala) आढळून आलं आहे.  JN.1 व्हेरिएंटचे पहिले प्रकरण समोर आल्याने केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देखरेख ठेवण्यास सांगितले. 

हेही वाचा : 

देशात पुन्हा कोरोनाचं टेन्शन! केरळमध्ये गेल्या 24 तासात तीन जणांचा मृत्यू तर 292 कोरोनाबाधितांची नोंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 14 January 2025सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, खंडणी प्रकरणात आवाजाचे नमुने गोळा केले
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Embed widget