एक्स्प्लोर

देशात पुन्हा कोरोनाचं टेन्शन! केरळमध्ये गेल्या 24 तासात तीन जणांचा मृत्यू तर 292 कोरोनाबाधितांची नोंद

Coronavirus In India : एकाच दिवसात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने नागरिकांना न घाबरण्याचे आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. 

Coronavirus In India : देशात सध्या कोरोनामुळे (Kerala Corona Update) आणखी चिंता वाढण्याची शक्यता दिसून येत आहे. केरळ राज्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे.  मंगळवारी, 19 डिसेंबर रोजी  292 कोविडबाधितांची नोंद करण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आता केरळमध्ये 2041  कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. तसेच एकाच दिवसात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने नागरिकांना न घाबरण्याचे आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. 

गेल्या काही वर्षांपासून जगाची झोप उडवणाऱ्या कोरोना व्हायरसनं (Coronavirus Updates) पुन्हा एकदा धाकधूक वाढवली आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि कोरोनाच्या (Covid-19) संसर्गाबाबत पुन्हा एकदा सतर्कतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविडचा नवा सबव्हेरियंट (New Subvariant of Covid) भारतात (India Corona Update) आल्याचं समोर आलं आहे. कोविड-19 चा सबव्हेरियंट JN.1 चं पहिलं प्रकरण केरळमध्ये (Kerala) आढळून आलं आहे.  JN.1 व्हेरिएंटचे पहिले प्रकरण समोर आल्याने केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देखरेख ठेवण्यास सांगितले. 

भारतात कोविड-19 च्या JN.1 व्हेरिएंटचा पहिला बाधित 8 डिसेंबर रोजी केरळमध्ये नोंदवले गेले. यापूर्वी, तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका प्रवाशाला सिंगापूरमध्ये JN.1 प्रकाराची लागण झाल्याचे आढळून आले होते. इन्फ्लूएंझा-सदृश आजार (ILI) आणि गंभीर तीव्र श्वसन आजार (SARI) च्या जिल्हा-आधारित प्रकरणांची तपासणी आणि प्रकरणे लवकर शोधण्यासाठी सर्व आरोग्य सुविधांबाबत नियमितपणे अहवाल देण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य खात्याने दिले आहेत.

राज्यात मंगळवारी 11 नवीन रुग्ण आढळले

 महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे (Maharashtra Coronavirus Updates) 11 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी आठ केवळ राजधानी मुंबईत आढळून आले. आतापर्यंत 35 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 27 फक्त मुंबईत (Mumbai Coronavirus)  सापडले आहेत.  आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत 27, पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक रुग्ण सक्रिय आहे. आयसोलेशनमध्ये 23 रुग्ण आहेत. मंगळवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मुंबईत कोरोनाचे 27 रुग्ण आढळले आहेत. तर, ठाणे जिल्ह्यात 5 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पुण्यात 2 आणि कोल्हापुरात एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे.  

हे ही वाचा :

कोरोना संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत, जाणून घ्या नेमके काय झाले बदल?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Shrikant Shinde Full Speech : शिवसेना-मनसे फेव्हिकॉल का मजबूत जोड,  राज ठाकरेंसमोर जोरदार भाषणRaj Thackeray on Shivsena Stage Thane  : 19 वर्षांनी राज ठाकरेंचं शिवसेनेच्या मंचावर पहिलं पाऊल....Raj Thackeray Thane Speech : शिवसेनेचा मंच, बाळासाहेबांची स्टाईल! राज ठाकरेंकडून भाषणाची सरुवात कशी?Vare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 12 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2024 | रविवार
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
'ओऽऽऽ सर्वज्ञानी संजय राऊत, देवेंद्रजींना उपचार शिकवायला तुमच्यासारख्या कंपाऊंडरची गरज नाही'; चित्रा वाघ यांचं जोरदार प्रत्युत्तर
Embed widget