एक्स्प्लोर

Coronavirus | कोरोना रक्त तपासणीची सोशल मीडियावर फिरणारी 'ती' यादी खोटी

राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 42 वर पोहोचला आहे. अशातच कोरोनाबाबत अनेक समज-गैरसमज पसरलेले आहेत. त्याचबरोबर कोरोना संदर्भात खोटी माहिती पसरवणारे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मुंबई : सध्या देशासह राज्यातही कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. अशातच कोरोना संदर्भात अनेक अफवा पसरत आहेत. कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने सांगूनही अफवा काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. व्हॉट्सअॅपवर कोरोनाच्या रक्त तपासणीसाठी महाराष्ट्रातील काही हॉस्पिटल्सची यादी व्हायरल झाली आहे. परंतु ही यादी खोटी असून कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी रक्ताची चाचणी केली जात नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे.

महाराष्ट्र डिजीआय पीआरच्या ऑफिशिअल फेसबुक आणि ट्विटर हॅन्डलवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र डिजीआय पीआरच्या अकाउंटवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये 'कोरोनासाठी संशयित रुग्णांची तपासणी करताना रक्ताची चाचणी केली जात नाही, रुग्णाचा घशाचा द्राव घेऊन प्रयोगशाळेत पाठविला जातो, त्यामुळे #कोरोना रक्त तपासणी महाराष्ट्रातील हॉस्पिटलच्या नावांच्या यादीचा व्हायरल मेसेज खोटा; आरोग्य विभागाचा महत्वाचा खुलासा' असं नमूद करण्यात आलं आहे. तसेच त्यासोबत व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या यादीचा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ : coronavirus | मुंबईत लोकल आणि रस्ते वाहतुकीवर 'कोरोना' चा काय परिणाम?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चिकन खाल्ल्यामुळे कोरोना होतो ही अफवाही पसरवण्यात आली होती. या अफवेमुळे पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्यामुळे याप्रकरणाची गंभीर दखल सरकारकडून घेण्यात आली होती. सोशल मीडियावर चुकीची माहिती अर्थात अफवा पसरवणाऱ्यांच्या विरोधात राज्य सरकारच्यावतीने सायबर क्राईमकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात बोलताना या अफवेमुळे पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याने गुन्हा दाखल केल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली होती.

संबंधित बातम्या :

Coronavirus | मुंबईतल्या डॉक्टरांच्या टीमचा अनोखा उपक्रम, कोरोनाबाबत फोनवरुन मोफत सल्ला

Coronavirus | मुंबई लोकल ट्रेन बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेणार : राजेश टोपे

Coronavirus | असंवेदनशीलता... रुग्णालयात कोरोनाचे पेशंट असल्याने विष प्यायलेल्या तरुणाला उपचारासाठी नेण्यास नकार, तरुणाचा उपचाराविना मृत्यू

Coronavirus | कोरोनोमुळे मध्य रेल्वेच्या 23 तर पश्चिम रेल्वेच्या 10 गाड्या रद्द

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
Yavatmal Ashram School: विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
विद्यार्थीनींच्या स्नानगृहाला ना दरवाजे, ना साध्या लाईटची सोय; 177 विद्यार्थ्यांसाठी अवघे 15 बंक बेड; माजी मंत्र्याच्या आश्रमशाळेतील भयावह वास्तव समोर
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget