एक्स्प्लोर

आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन मुंबईत बसून नियंत्रण ठेवतायेत : शरद पवार

आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन (मुख्यमंत्री ठाकरे) एका ठिकाणी बसून सगळी टीम काम करते आहे की नाही, यावर नियंत्रण ठेवत आहेत. असं सांगून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची शनिवारी पत्रकार परिषदेत पाठराखण केली.

औरंगाबाद : कोरोनाचे सबंध महाराष्ट्रावर संकट आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात जाऊन बसले तर बाकीच्या जिल्ह्यांच्या समस्यांवर तातडीने निर्णय घेता येणे अवघड होईल. आमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव कॅप्टन (मुख्यमंत्री ठाकरे) एका ठिकाणी बसून सगळी टीम काम करते आहे की नाही, यावर नियंत्रण ठेवत आहेत. मला करमत नाही. मी सतत लोकांत राहणारा माणूस आहे, मला एका जागी बसवत नाही. म्हणून मी फिल्डवर जात असल्याचे सांगून शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांची शनिवारी पत्रकार परिषदेत पाठराखण केली. 80 वयोमान असूनही राज्यातील विविध जिल्ह्यात जाऊन शरद पवार आढावा घेत आहेत पण मुख्यमंत्री काही बाहेर पडत नाही, या टीकेवर पवार यांनी भाष्य केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनामुळे वाढलेला मृत्यूदर, प्रशासनाच्या उपाययोजना जाणून घेण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीला शरद पवार यांची विशेष उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी बैठकीला होते.

भूकंप झाला होता तेव्हा त्या भागात मुख्यमंत्र्याचे कार्यालय हलवण्यापर्यंतची कार्यवाही शरद पवार यांनी केली होती. त्या संदर्भात विचारेल्या प्रश्नावर बोलाताना पवार म्हणाले, भूकंपाची आपत्ती तशी मर्यादित जिल्ह्यात आणि गावांमध्ये होती. त्यामुळे तेथे तसे करता आले. कोरोना ही समस्या संपूर्ण राज्यभर आहे. त्यामुळे राज्यातील सर्व माहिती मुख्यमंत्री स्वत: सकाळपासून संध्याकाळपर्यंत घेतात. तातडीने राज्याचे निर्णय घेण्यासाठी कॅप्टनने चमू नीट काम करतो आहे का हे पाहायचे असते. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. पालकमंत्र्यासह येथील नेते आवश्यकत त्या बाबी त्यांच्या कानावर घालत आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आवश्यक त्या बाबी कानावर टाकू, असं म्हणत मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीची शरद पवार यांनी पाठराखण केली.

पुढे ते म्हणाले की, मला अनेक संकटात अनेकांनी मदत केली आहे. त्यामुळे संकटाच्या काळात आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली पाहिजे, त्यांच्याशी बोलले पाहिजे. या कर्तव्य भावनेतून आपण दौरा करत आहोत. त्यामागे अन्य कोणताही उद्देश नाही. प्रश्न विचारताना वयाच्या उल्लेखावरुन त्यांनी मिश्किल टिप्पणीही केली. माझे वय 80 असताना तुम्ही ते 85 कशासाठी करता त्यावर माझा आक्षेप आहे, असे म्हणत शरद पवारांनी पत्रकार परिषदेचे वातावरण हलके राहील, असेही पाहिले.

आपत्ती व्यवस्थापन कायद्याांतर्गत खासगी डॉक्टरांना कामावर बोलावण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. अद्याप तशी वेळ आली नसल्याचे सांगत असे करता येईल, असेही त्यांनी सूचित केले. औरंगाबादमध्ये अल्पसंख्याक समाजाने सहकार्य केल्याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केला. दोन दिवसापासून बकरी ईदसाठी सामुहिक नमाज अदा करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली होती. त्यांच्याकडे पाहून या पुढेही कोरोना काळात सहकार्य मिळेल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली येथील कोरोनाची स्थिती काळजी करण्यासाठी असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रातही मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिली, नाशिक औरंगाबाद या शहराची स्थिती काळजी करण्यासारखी आहे. ऑगस्टमध्ये कदाचित करोनाची मोठी लाट आली तर खाटांची कमतरता भासू शकेल. त्यामुळे औरंगाबादमध्ये खाटा वाढवण्यासाठी काम करावे लागेल, अशी सूचना त्यांनी यावेळी प्रशासनास केली. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याांतर्गत खासगी डॉक्टरांना समन्स बजावून कामावर बोलावता येण्याची तरतूद आहे. अद्यााप तशी वेळ आली नाही. मात्र अशी तरतूद वापरता येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी उदय चौधरी, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडये तसेच घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कानन येळीकर यांनी कोरोना संदर्भातील माहिती पालकमंत्री सुभाष देसाई व लोकप्रतिनिधीसमोर दिली. केंद्र सरकारकडे करोनाकाळात कोणती मागणी नोंदवायची याचा साधारण अंदाज यावा म्हणून दौरा करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar | कॅप्टन एकाच ठिकाणी असावा म्हणून मुख्यमंत्री मुंबईत - शरद पवार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget