एक्स्प्लोर
बारामतीत एकही कोरोना बाधित रुग्ण नाही, उपविभागीय अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
बारामतीत एकही कोरोना बाधित रुग्ण नसल्याचं उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहनही कांबळे यांनी केलं आहे.

बारामती : कोरोना बाधित एकही रुग्ण बारामती शहर व तालुक्यात आढळलेला नाही, नागरिकांनी काळजी घ्यावी मात्र घाबरू नये अस, आवाहन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केलं आहे. कोरोनाचे रुग्ण आढळल्याची शहरात दोन दिवस विविध चर्चांना उधाण आलं होते, त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत दादासाहेब कांबळे यांनी खुलासा केला. परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती तातडीने द्यावी, असे आवाहनही त्यांनी केलं आहे. बारामती तालुक्यात परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात असून त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांवरही लक्ष ठेवलं जात आहे. अशा व्यक्तींनी घरातच थांबावं असंही दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
भारत
महाराष्ट्र























