एक्स्प्लोर

Coronavirus | राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात

पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. एक रुग्णामध्ये सौम्य लक्षणे तर दुसऱ्या रुग्णात कोरोना लक्षणे नाही सदर रुग्ण नायडू हॉस्पिटल, पुणे येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

पुणे : पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. सदर रुग्ण  नायडू हॉस्पिटल, पुणे येथे विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.  त्यापैकी एका रूग्णामध्ये  कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत  आहे. तर दुस-या  रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळून आली नाहीत. सदर रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेवून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.  तथापि, नागरिकांनी घाबरुन जाण्याची काहीही कारण नाही.

पुण्यातील  पती  - पत्नी   1 मार्च रोजी दुबईवरुन पुण्यात आले.  हे दोघे  एका ट्रॅव्हल एजन्सी मार्फत दुबईला पर्यटनासाठी गेले होते.  मात्र एक तारखेला ते जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती.  त्यामुळे ते त्यांच्या घरी गेले.  मात्र आज त्यांना त्रास होऊ लागल्याने हे पती पत्नी तपासणीसाठी महापालिकेच्या नायडू  हॉस्पिटलमधे पोहचले.  त्यानंतर त्यांची सॅंपल्स टेस्टिंगसाठी एन आय व्ही कडे पाठवण्यात आली असता ती पॉझिटीव्ह आढळली. हे दोघे पती पत्नी दुबई वरुन आले तेव्हा त्यांच्यामधे कोरोनाची कोणतीही लक्षणं नव्हती आणि दुबईमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं तोपर्यंत  दिसून आलेलं नव्हतं.  त्यामुळे या दोघांबरोरच ते ज्या चाळीस जणांबरोबर दुबईला गेले होते त्यापैकी कोणाच्याच टेस्ट करण्यात आल्या नाहीत असं स्पष्टीकरण पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलंय.

मात्र आता हे पती पत्नी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने ते ज्यांच्यासोबत दुबईला गेले होते त्या 40 जणांच्याही टेस्ट कराव्या लागणार आहेत.  त्याचबरोबर कोरोना पॉझिटीव्ह आढळलेले हे दोन पती -  पत्नी मागील आठ दिवसांमध्ये ज्यांच्या संपर्कात आले असतील अशा सर्वांचा शोध घ्यावा लागणार असल्याचं आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. तथापि, नागरिकांनी घाबरुन जाण्याची काहीही कारण नाही.

होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गांवोगांव भरणा-या यात्रा व ऊरुसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीची ठिकाणे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. होळी सण आपल्या कुटुंबियांसोबतच साजरा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये : आरोग्यमंत्री राजेश टोपे 

कोरोनाचे दोन संशयित रुग्ण आज पुणे येथे आढळून आले. दोघांवर लक्षणांवर आधारित उपचार सुरू झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले. धुलिवंदनाचा सण साजरा करताना होणारी गर्दी नागरिकांनी टाळावी. सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता पाळावी. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर रुमाल ठेवावा. मास्क ऐवजी तोंडाला रुमाल वापरावा,अशी सतर्कता बाळगावी, असे आवाहनही आरोग्यमंत्री यांनी केले आहे. कोरोनाच्या संशयित रुग्णावर लक्षणांवर आधारित उपचार केले जात असून केरळ येथेही तीन रुग्ण आढळून आले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांचे नमुने पुन्हा निगेटीव्ह आल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

#Corona कोरोनासाठी पुण्यातील नायडू रुग्णालय सज्ज, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून रुग्णालयाची पाहणी

संबंधित बातम्या :

Coronavirus |देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, संख्या 43 वर

माझा विशेष | कोरोनाची भीती...कोंबडी उद्योगाची माती...

 

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Amit Shah On Ajit Doval Pune: अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
अमित शाहांकडून अजित डोवाल यांचं तोंडभरून कौतुक, पंतप्रधान मोदींनी दिलेला महत्वाचा सल्ला आणि पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला
Devendra Fadnavis on Ajit Doval: एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह-अजित डोवालांचं कौतुक
एका धुरंधरला पुरस्कार द्यायला दुसरे धुरंधर पुण्यात, देवेंद्र फडणवीसांकडून अमित शाह-अजित डोवालांचं कौतुक
Sunetra Pawar Pune Speech : सुनेत्रा पवारांकडून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरून सरकार अन् अजित डोवाल यांचं कौतुक, तर एकनाथ शिंदेनी म्हटलं राम लक्ष्मणाप्रमाणे मोदी-शाहांचं नाव घेतलं जातं
सुनेत्रा पवारांकडून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवरून सरकार अन् अजित डोवाल यांचं कौतुक, तर एकनाथ शिंदेनी म्हटलं राम लक्ष्मणाप्रमाणे मोदी-शाहांचं नाव घेतलं जातं

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget