एक्स्प्लोर

तळीरामांनी सावरला सरकारचा आर्थिक डोलारा, मद्यविक्रीतून सरकारच्या तिजोरीत जमा झाले 3900 कोटी

राज्यात कोरोनाच्या संकटात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था कोसळली होती. परंतु, आता तळीरामांनी अर्थव्यवस्थेला हातभार लावल्याचं समोर आलं आहे. राज्यातील तळीरामांनी चार महिन्यात राज्याच्या तिजोरीत थोडे थोडके नव्हे तर 3900 कोटी रुपयांची भर टाकली आहे.

मुंबई : 23 मार्चपासून राज्यात लॉकडाऊन सुरु झाला. सहा महिने झाले तरी अजून लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे कर वसुली बंद झाल्यानं सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला होता. सरकारच्या तिजोरीत कररुपाने मोठी भर घालणाऱ्या मद्याच्या विक्रीस मे महिन्यात राज्य सरकारने परवानगी दिली. त्यानंतर राज्यातील तळीरामांनी चार महिन्यात राज्याच्या तिजोरीत थोडे थोडके नव्हे तर 3900 कोटी रुपयांची भर टाकली आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील रकमेपेक्षा ही रक्कम निम्मीच आहे.

राज्यातील वाईन शॉप उघडावे अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेकांनी केली होती. मद्यविक्रीतून राज्याच्या तिजोरीत भर पडेल असा युक्तीवाद वाईन शॉप उघडण्याची मागणी करणारे करीत होते. अखेर सरकारने 4 मे पासून राज्यात वाईन शॉप सुरु करण्यास परवानगी दिली. परंतु वाईनशॉप मालकांना दुकानात नव्हे तर मद्याची होम डिलिव्हरी देण्यास सांगितले होते. आता मात्र दुकानात जाऊन मद्य विकत घेण्याची परवानगी सरकारने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 4 महिन्यांत राज्य सरकारला तब्बल 2362 कोटींचा महसूल मिळाला आहे. एकूण 3900 कोटींची मद्य विक्री झाली आहे. सरकारच्या तिजोरीत 682 कोटी देशी दारूपासून, 1568 कोटी विदेशी मद्यापासून आणि 111 कोटी बियर विक्रीतून कररुपाने जमा झाले आहेत.

दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला जवळपास 50 कोटी आणि महिन्याला साधारणतः 1500 कोटी रुपये मिळतात. एप्रिल ते जुलै 2020 या चार महिन्यात 3384 कोटी कररुपाने मिळाले होते.

राज्यात 15 हजार रेस्टॉरन्ट अँन्ड बार असून 1685 वाईन शॉप आहेत. 5 हजार बियर शॉप आणि 4045 देशी दारुची दुकाने आहेत. राज्य सरकारने आता फक्त वाईन शॉपलाच परवानगी दिलेली आहे. मद्यविक्रीची सर्व दुकाने सुरु झाल्यास सरकारला महिन्याला 1500 कोटींचे उत्पन्न मिळणे सुरु होईल.

राज्यात दरवर्षी 87 कोटी 75 लाख लिटर दारु तळीराम रिचवतात. यात 35 कोटी लिटर देशी, 21 कोटी लिटर विदेशी मद्य, 30 कोटी लिटर बियर आणि 75 लाख लिटर वाईनचा समावेश आहे. यात हातभट्टीच्या दारुचा समावेश नाही. कारण ती अनधिकृत असून सरकारला त्यापासून कसलाही कर मिळत नाही.

महत्त्वाच्या बातम्या : 

सत्तेसाठी मुहूर्त तुम्हालाच विचारून काढतो, देवेंद्र फडणवीसांनी स्वकीयांचे कान टोचले

खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित खाटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची मुदतवाढ

मुख्यमंत्री पुन्हा 'फायली'वर, खाजगी रुग्णालयाच्या दर नियंत्रण आदेशाला तात्काळ मंजुरी द्या, आमदार अतुल भातखळकर यांची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Wagh Murder Case : सर्वात मोठा खुलासा; प्रेम प्रकरणातून बायकोनेचं सुपारी देऊन खून केलाCity 60 : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 25 December 2024: ABP MajhaDevendra Fadnavis on Manoj Jarange : आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाहीABP Majha Headlines : 08 PM : 24 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
राज्यातील नगरपालिका, महापालिकेच्या निवडणुका कधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला कालावधी
Yearly Horoscope 2025 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी 2025 वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Yearly Horoscope 2025 : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष 2025 कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीसाठी नवीन वर्ष कसं राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'वाह रे बीड आणि वाल्मिक कराडांची दहशत'; अंजली दमानियांकडून आणखी बंदुकधारी फोटो शेअर
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
'झाडू'ला मतदान केलं तरच 2100 रुपये खात्यात येतील; दिल्लीतही विधानसभेला लाडकी बहीण योजनेची चलती
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
मुंबईत बाळासाहेब ठाकरेंचं आंतरराष्ट्रीय स्मारक; पहिल्या टप्प्यात 181 कोटींचं काम पूर्ण, पाहा PHOTOS
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
कल्याण अत्याचारप्रकरणी संताप, उपसभापती निलम गोऱ्हेंचं पोलिसांना पत्र; आरोपीला जामीन मिळू देऊ नका
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
पालकमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांनी आपला चॉइस सांगितला; भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, तशी गडचिरोलीकरांची इच्छा!
Embed widget