Coronavirus UPDATES | मुंबई लोकल आणि बससेवा बंद करणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
LIVE
Background
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
मुंबई : राज्यात यवतमाळ येथे एक आणि नवी मुंबई येथे एक असे दोन करोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 39 झाली आहे. राज्यात 108 लोक विलगीकरण कक्षात दाखल असून 1063 होम क्वारंटाईन असून त्यापैकी 442 जणांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. दरम्यान मुंबईत एका तीन वर्षाच्या मुलीला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई महापालिकेने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. कल्याण येथील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालेल्या व्यक्तीची 33 वर्षीय पत्नी आणि तीन वर्षीय मुलीचे नमुने कोरोना पॉजिटिव्ह आल्याचा तपशील महापालिकेने दिला आहे.
यवतमाळ येथे कोरोना बाधित आढळलेली 51 वर्षाची महिला ही दुबई सहलीला गेलेल्या चमूतील आय टी तज्ञाची आई आहे. ती स्वतः ही दुबई सहलीमध्ये सहभागी झाली होती. यामुळे यवतमाळ येथे आढळेल्या रुग्णांची संख्या 3 झाली आहे. दुबईला गेलेल्या 40 जणांच्या चमूतील एकून 15 जण कोरोना बाधित आढळले असून 22 जण निगेटिव्ह आढळले आहेत. या चमूतील बेळगाव येथील 3 जणांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरात विलग करण्यात आले आहे.
आज कोरोना बाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता, तो फिलिपाईन्सचा नागरिक आहे. आजपर्यंत फिलिपाईन्सहून नवी मुंबईत आलेल्या या 10 जणांच्या चमूतील 3 जण कोरोना बाधित आढळले असून इतर 7 जण कोरोना निगेटिव्ह आढळले आहेत.
राज्यात अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
पिंपरी चिंचवड मनपा- 9,
पुणे मनपा- 7,
मुंबई -6, नागपूर-4,
यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण-प्रत्येकी 3,
रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद- प्रत्येकी 1 असे एकूण 39 रुग्ण आढळून आले आहेत.