एक्स्प्लोर

LIVE UPDATES |अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता 10 ऑगस्टला

दिग्गजांचं व्हिजन ठरवणार भवितव्य नव्या महाराष्ट्राचं. #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन सकाळी 10 वाजल्यापासून यंदाचा गणेशोत्ससव कसा साजरा कराल? मुंबई महापालिकेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना Ram Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाही कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

LIVE UPDATES |अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता 10 ऑगस्टला

Background

मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सुरू होणार, राज्य सरकारच्या गाईडलाईन्स जारी

केंद्र सरकारने अनलॉक- 3 च्या गाईडलाईन जारी केल्यानंतर राज्य सरकारनेही गाईडलाईन जारी केल्या आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. नव्या गाईडलाईनमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. मात्र सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेदरम्यान मॉल्स आणि शॉपिंग कॉम्पेक्स सुरु राहणार आहेत. मॉल्समधील थिएटर मात्र सुरू होणार नाहीत. फूड मॉलमधील हॉटेल्स फक्त घरपोच जेवण देऊ शकतील..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज पुणे दौरा, कोरोनाविषयक उपयाययोजनांचा आढावा घेणार

 पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुण्याचा दौरा करणार आहेत. पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री आज दिवसभर पुण्यात असतील. राज्यावर कोरोनाचं संकट असूनही मुख्यमंत्री मातोश्रीचा उंबरठा ओलांडत नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार होत आहे. शिवाय पुण्यावर अन्याय होत असल्याची टीकाही विरोधक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अंकिता लोखंडेची चौकशी होणार

बिहार पोलिस आता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतची माजी प्रेयसी अंकिता लोखंडेची चौकशी करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंकितानेच सुशांत आणि रिया यांच्यात सुरू असलेल्या तणावाची माहिती सुशांतच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतरच सुशांतच्या मृत्यू प्रकरणात रिया कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांकडे केली होती.

19:42 PM (IST)  •  31 Jul 2020

सर्वसामान्य गरीब माणसाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये व महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.
14:37 PM (IST)  •  31 Jul 2020

राज्य शासनाचा मोठा निर्णय, आणीबाणीच्या विरोधात कारावास भोगलेल्यांचा गौरव करण्याचे धोरण रद्द, ,कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे वित्तीय वर्षात कर आणि करेतर उत्पन्नातील अपेक्षित महसुलात घट झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. हे लक्षात घेऊन 1975 ते 77 या कालावधीत लोकशाही करता लढा देणाऱ्या व्यक्तीचा सन्मान गौरव करणे राज्य सरकारने बंद केले. आणीबाणीच्या काळामध्ये ज्या व्यक्तींनी बंदिवास सोसला अशा व्यक्तींचा सन्मान गौरव करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घेतला होता. राज्यात भाजपा सरकारच्या काळात ह्या निर्णयाची अमलबजावणी सुरू झाली होती. परंतु नव्या सरकारने कोविडमुळे आणीबाणीच्या काळात बंदिवास भोगलेल्यांना गौरव न करण्याचं ठरवलं आहे.
12:46 PM (IST)  •  31 Jul 2020

अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी 8 ऑगस्टपर्यंत तहकूब, प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्यानं हायकोर्टाचा तूर्तास सुनावणीस नकार, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 10 ऑगस्टपर्यंत तहकूब, 7 ऑगस्टपर्यंत याचिकाकर्त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश
12:24 PM (IST)  •  31 Jul 2020

अंतिम वर्गाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता 10 ऑगस्टला होणार. केंद्रीय गृहमंत्रालयाचं याबाबतचं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाने वेळ वाढवून दिला. तोपर्यंत यूजीसीच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणीही फेटाळली, अंतरिम आदेश देणार नाही असं कोर्टाचं म्हणणं.
21:31 PM (IST)  •  30 Jul 2020

सातारा - कोरोना बाधित रुग्ण आणायला गेलेल्या गाड्यांवर जमावाची दगडफेक, महाबळेश्वरातील रांजनवाडी येथील घटना, तीन गाड्यांची तोडफोड, दगडफेक आणि हातात काठ्यांनी जमावाचा हल्ला, घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण
20:31 PM (IST)  •  30 Jul 2020

विजेच्या धक्क्याने अवघ्या 33 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप मागील 5-6 महिन्यापासून विजेचे खांब शेतात पडून होते, तक्रार देऊन देखील कोणतीही कारवाई न केल्याने प्रकार घडल्याचा आरोप दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगा गावातील दुर्दैवी घटना
17:22 PM (IST)  •  30 Jul 2020

औरंगाबादच्या एन 3 भागात ईडीचा छापा, 62 लाख रोख आणि 7 किलो सोनं जप्त, परदेशी चलन विनिमय घोटाळाअंतर्गत माहितीच्या आधारावर छापे, फेमा कायद्याअंतर्गत 3 ठिकाणी छापे
16:07 PM (IST)  •  30 Jul 2020

अमरावतीच्या बडनेराच्या मोदी हॉस्पिटलची तोडफोड, कोरोना संशयित 24 वर्षीय मुलीचा गुप्तागांतील स्वॅब घेतल्याचे प्रकरण, ज्या बडनेराच्या हॉस्पिटलमध्ये मुलीचा चुकीच्या पद्धतीने स्वॅब घेण्यात आला होता, त्या मोदी हॉस्पिटलची शिवसेना आणि MIMच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली, कार्यकर्त्यांनी रुग्णालयाची दारे, खुर्च्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली, या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे
02:24 AM (IST)  •  30 Jul 2020

परभणी : सलग तीन वर्ष कापूस पिकांचे नुकसान करणाऱ्या गुलाबी बोण्ड अळीचा यंदाही मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आलाय. ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्यात कापसाची लागवड केली आहेत. त्या कापसाला फुले लागली आहेत. मात्र तिथे गुलाबी बोण्ड अळीचा प्रादुर्भाव आढळून आलाय.परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पथकाने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन या प्रादुर्भावाची पाहणी केली असून शेतकऱ्यांना याच्या सामुहिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
13:59 PM (IST)  •  30 Jul 2020

आत्महत्येच्या उद्देशाने मुंबईतील बोरिवली नॅशनल पार्क इथल्या नदीत उडी मारलेल्या महिलेचा जीव एका पोलिसाने वाचवला. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास एका महिलेने नदीत उडी मारली, अशी माहिती कस्तुरबा पोलीस स्टेशनला मिळाली. त्यानंतर पोलीस हवालदार अभिमान मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाऊस पडल्याने नदीचा प्रवाह देखील जोरात होता. महिलेला वेळीच मदत मिळाली नाही तर बरंवाईट होऊ शकतं. ही बाब लक्षात घेऊन अभिमान मोरे यांनी थेट नदीत उडी मारली आणि महिलेला सुखरुप बाहेर काढलं. या सर्व घटनेचा व्हिडीओ तिथे उपस्थित लोकांनी काढल्याने अभिमान मोरेंच्या धडाकेबाज कामगिरी जगासमोर आली. संबंधित महिला सुखरुप असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nilesh Lanke Emotional Parner Speech : आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
Kapil Sharma : कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
Sanjay Nirupam : संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vare Nivadnukiche : निवडणुकीची प्रत्येक बातमी एका क्लिकवर : 29 March 2024Girish Mahajan : विजयसिंह मोहिते पाटलांच्या मनधरणीचे भाजपचे प्रयत्नCM Eknath Shinde  : मुख्यमंत्र्यांची वाट बघून हेमंत गोडसे नाशिकला परतलेABP Majha Headlines : 8 PM : 29 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nilesh Lanke Emotional Parner Speech : आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
आमदारकीचा राजीनामा, हुंदका आवरला, लंके भावूक | Ahmednagar
Kapil Sharma : कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
कपिल शर्मा राजकारणात एन्ट्री करणार? विनोदवीराने दिली मोठी अपडेट
Sanjay Nirupam : संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
संजय निरुपम शिंदे गटाच्या गळाला? मुख्यमंत्री अचानक दोन तास गायब झाल्याने चर्चांना उधाण
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Saudi Prince Salman : सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला एनआयएकडून 10 लाखांचे बक्षीस
रामेश्वरम कॅफे स्फोट : संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला NIAकडून 10 लाखांचे बक्षीस
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
MS Dhoni And Pathirana Video: गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
Embed widget