एक्स्प्लोर
Advertisement
देवस्थानांवर कोरोना इफेक्ट, मास्क घातल्याशिवाय त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांना नो एण्ट्री, साई, विठ्ठल मंदिरातही स्वच्छतेवर भर
गर्दीच्या ठिकाणी आता आरोग्य यंत्रणांना सूचना देण्यात आल्या असून आता राज्यातील महत्वाच्या देवस्थानांमध्ये देखील काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील देवस्थानांमध्ये खबरदारी बाळगण्यात येतेय.
मुंबई : जगभर कोरोना व्हायरसने उच्छाद मांडला असून भारतात सुद्धा व्हायरसचा शिरकाव झाल्यान प्रशासनाला जाग आली आहे. गर्दीच्या ठिकाणी आता आरोग्य यंत्रणांना सूचना देण्यात आल्या असून आता राज्यातील महत्वाच्या देवस्थानांमध्ये देखील काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील देवस्थानांमध्ये खबरदारी बाळगण्यात येतेय. शिर्डी, त्र्यंबकेश्वर आणि पंढरपूर मंदिर प्रशासनानं स्वच्छता वाढवण्यावर भर दिला आहे.
शिर्डी नगरपरिषद आणि साई संस्थानकडून ओल्या कपड्यांनी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे. त्याचबरोबर खबरदारी म्हणून मेडिकल टीमसुद्धा सज्ज झाली आहे. कोणत्याही ठिकाणी आजर सदृश्य रुग्ण आढळल्यास तात्काळ त्याच्यावर उपाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दुसरीकडे त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनानं भाविक आणि कर्मचाऱ्यांना मास्क लावणं बंधनकारक केलं आहे. शिवाय हात आणि पाय धुतल्याशिवाय मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. परदेशी नागरिकांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. भाविकांना सर्दी, खोकला यासारखी लक्षणे दिसली तर त्यांना आरोग्य पथकाच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
Corona Virus | भारतातील 'या' शहरांमध्ये कोरोनाची बाधा; देशभरात 29 जणांना लागण
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचीही दिवसातून सहा वेळा साफसफाई करण्यात येत आहे. तसंच भाविकांना स्वच्छता पाळण्याचंही आवाहन करण्यात येतं आहे. कोरोनापासून काय खबरदारी घ्यावी याच्या माहितीचे फलकही मंदिर प्रशासनानं लावले आहेत. विठुरायाच्या दर्शनाला येणाऱ्या हजारो भाविकांना घटक कोरोना व्हायरस पासून संरक्षण मिळविण्यासाठी घ्यावयाच्या खबरदारीचे फलक आज विठ्ठल मंदिर आणि परिसरातील दर्शनी भागात लावण्यात आले असून भाविक हे वाचताना दिसून येत आहेत . विठुरायाच्या दर्शनासाठी देशभरातून रोज हजारो भाविक मंदिरात येत असतात. त्यांना या व्हायरसची माहिती होऊन खबरदारी घेता येण्यासाठी समितीने सध्या मराठीतून फलक लावले असले तरी आता कानडी, तेलगू , इंग्रजी आणि हिंदी भाषेतूनही फलक बनविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे . ही अत्यंत उपयुक्त माहिती असून आता गावाकडे गेल्यावर आम्ही हि माहिती सगळ्यांना सांगणार असल्याच्या प्रतिक्रिया भाविकांतून मिळत आहेत .
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत आहे. प्रत्येक भाविकाच्या हातावर सॅनिटायझर देण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसात याबाबतची यंत्रणा उभी करण्यात येणार आहे. चारही दरवाजातून येणाऱ्या भाविकांचे हात स्वच्छ करण्यात येणार आहेत.
CoronaVirus Outbreak | कोरोना व्हायरसपासून बचावासाठी अशी घ्याल काळजी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement