एक्स्प्लोर

Corona Virus | भारतातील 'या' शहरांमध्ये कोरोनाची बाधा; देशभरात 29 जणांना लागण

संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायसमुळे आतापर्यंत 3200 लोकांता मृत्यू झाला आहे. 12 जानेवारी पर्यंत फक्त चीन कोरोना व्हायरसशी लढत होता. परंतु आता महिन्यात कोरोना व्हायरस 81 देशांत पसरला आहे. मागील पाच दिवसात कोरोना व्हायरस 22 देशांत पसरला आहे. भारतात कोरोना व्हायरस जानेवारी महिन्यात दाखल झाला होता.

नवी दिल्ली : जगभरात हैदोस घालणारा कोरोना आता भारतातही दाखल झाला आहे. भारत 29 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचं समोर आलं असून त्यातील 3 जण बरे झाले असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी बुधवारी सांगितले की, 'भारतातील कोरोना बाधितांची संख्या 29 झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, कमीत कमी 7 राज्यांमध्ये कोरोनाची लागण झालेले रूग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, केरल, तेलंगाना, राजस्थान आणि हरियाणाचा समावेश आहे. या राज्यांमध्ये कोरोणाती बाधा झालेले संशयित किंवा लागण झालेले रूग्ण आढळून आले आहेत.

भारतामध्ये या शहरांमधील लोकांना कोरोना व्हायरसची बाधा

एकूण प्रकरणं : 29

दिल्ली : 17 केरळ : 3 तेलंगणा : 1 जयपूर : 1 आग्रा : 6 गुरुग्राम : 1

भारत कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज आहे का?

केंद्र आणि राज्य सरकारद्वारे कोरोनासी लढण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या संशयितांच्या तपासणीसाठी 15 प्रयोगशाळा सज्ज आहेत. गरज भासल्यास 50 प्रयोगशाळा सुरू करण्यासाठीही सज्ज आहेत. दिल्लीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची बाधा झालेल्या रूग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक त्या सर्व औषधांचा साठा असून डॉक्टर्स संपर्कात असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच कोरोनासाठी एक हेल्पलाइन नंबर - 011-23978046 जारी करण्यात आला आहे.

Coronavirus | महाराष्ट्रात एकही रुग्ण नाही, राज्य शासनाकडून खबरदारीची उपाययोजना, चुकीचे मेसेज पसरविणाऱ्यांवर गुन्हे

81 देशात करोना व्हायरसचे थैमान

संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायसमुळे आतापर्यंत 3200 लोकांता मृत्यू झाला आहे. 12 जानेवारी पर्यंत फक्त चीन कोरोना व्हायरसशी लढत होता. परंतु आता महिन्यात कोरोना व्हायरस 81 देशांत पसरला आहे. मागील पाच दिवसात कोरोना व्हायरस 22 देशांत पसरला आहे. भारतात कोरोना व्हायरस जानेवारी महिन्यात दाखल झाला होता.

रुग्णालयांना स्वतंत्र वॉर्ड बनवण्याचा आदेश

देशातील सर्व रुग्णालयांमध्ये चांगल्या दर्जाचे स्वतंत्र वॉर्ड तातडीने बनवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश याआधीही रुग्णालयांना देण्यात आला होता. सहसचिव स्तराच्या अधिकाऱ्यांनी अनेक रुग्णालयांना भेट दिली आणि त्यांनी तिथे स्थापन केलेल्या सुविधांचा आढावाही घेतला, अशी माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.

पाहा व्हिडीओ : कोरोनामुळे मुंबई विमानतळावर सतर्कता; प्रवाशांना सेल्फ रिपोर्टिंग फॉर्म भरणं अनिवार्य

कोरोना व्हायरस म्हणजे काय?

कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.

लक्षणे कोणती आहेत ?

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.

काय काळजी घ्याल?

तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या.

संबंधित बातम्या : 

जगात कोरोनाचा उद्रेक! 3200 लोकांचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani Rally Drone : परभणीत जरांगेंच्या रॅलीला किती गर्दी? पाहा ड्रोन व्हिडीओRani Lanke Protest | राणी लंकेंनी महिलांनी भरलेला ट्रॅक्टर घेऊन गाठले आंदोलनस्थळ! चक्काजामचा इशाराWorli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घरं फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Embed widget