एक्स्प्लोर

Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार पार, आज दिवसभरात 3041 रुग्णांची नोंद

दिलासादायक बाब म्हणजे आज 1196 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 14 हजार 600 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या राज्यात 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबई : राज्याचा कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजार पार गेला आहे. तर आज एकाच दिवशी तीन हजारहून अधिक रुग्ण राज्यात आढळले आहे. राज्यात आज 3041 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. अशारीतीने राज्य़ाचा कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे.

दिवसभरात 58 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूंची संख्या 1635 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1196 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 14 हजार 600 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. सध्या राज्यात 33 हजार 988 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात 58 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी 38 मृत्यू हे मागील 24 तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे 23 एप्रिल ते 20 मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईतील 39, पुण्यात 6, सोलापूर 6, औरंगाबाद शहरात 4, लातूरमध्ये 1, मीरा भाईंदरमध्ये 1 आणि ठाणे शहरात 1 मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 34 पुरुष तर 24 महिला आहेत. आज झालेल्या 58 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 30 रुग्ण आहेत तर 27 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 1 जण 40 वर्षांखालील आहे. या 58 रुग्णांपैकी 40 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 62 हजार 862 नमुन्यांपैकी 3 लाख 12 हजार 631 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 50 हजार 231 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 99 हजार 387 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून 35 हजार 107 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा तपशील (कंसात मृत्यूंची आकडेवारी) मुंबई महानगरपालिका : 30542 (988) ठाणे: 420 (4) ठाणे मनपा: 2590 (36) नवी मुंबई मनपा: 2070 (29) कल्याण डोंबिवली मनपा: 889 (7) उल्हासनगर मनपा: 189 (3) भिवंडी निजामपूर मनपा: 86 (3) मीरा भाईंदर मनपा: 464 (5) पालघर: 114 (3) वसई विरार मनपा: 562 (15) रायगड: 412 (5) पनवेल मनपा: 330 (12) नाशिक: 115 नाशिक मनपा: 110 (2) मालेगाव मनपा: 711 (44) अहमदनगर: 53 (5) अहमदनगर मनपा: 20 धुळे: 23 (3) धुळे मनपा: 95 (6) जळगाव: 294 (36) जळगाव मनपा: 117 (5) नंदूरबार: 32 (2) पुणे: 340 (5) पुणे मनपा: 5075 (251) पिंपरी चिंचवड मनपा: 267 (7) सोलापूर: 24 (2) सोलापूर मनपा: 522 (32) सातारा: 279 (5) कोल्हापूर: 236 (1) कोल्हापूर मनपा: 23 सांगली: 69 सांगली मिरज कुपवाड मनपा: 11 (1) सिंधुदुर्ग: 10 रत्नागिरी: 155 (3) औरंगाबाद: 23 औरंगाबाद मनपा: 1233 (46) जालना: 56 हिंगोली: 112 परभणी: 17 (1) परभणी मनपा: 5 लातूर: 67 (3) लातूर मनपा: 4 उस्मानाबाद: 31 बीड: 26 नांदेड: 15 नांदेड मनपा: 83 (5) अकोला: 36 (2) अकोला मनपा: 366 (15) अमरावती: 13 (2) अमरावती मनपा: 155 (12) यवतमाळ: 115 बुलढाणा: 40 (3) वाशिम: 8 नागपूर: 7 नागपूर मनपा: 464 (7) वर्धा: 4 (1) भंडारा: 10 गोंदिया: 39 चंद्रपूर: 10 चंद्रपूर मनपा: 9 गडचिरोली: 13 इतर राज्ये: 49 (11) एकूण: 50 हजार 231 (1635)

Corona 100 Updates | कोरोना व्हायरसचे शंभर अपडेट्स 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRohit Pawar on Ajit Pawar : अजित पवारांचा टोला , रोहित पवारांची टीकाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Amisha Patela Dating With Nirvaan Birla: कोण आहे बिझनेसमन निर्वाण बिर्ला? ज्याच्या मिठीत शिरलीये गदर फेम 49 वर्षांची अमिषा पटेल, अफेअरच्या चर्चा?
"मेरे डार्लिंग के साथ प्यारी शाम..."; 49 वर्षांच्या अमिषा पटेलनं शेअर केला रोमॅन्टिक फोटो, कुणाला करतेय डेट?
Embed widget