एक्स्प्लोर
राज्यात 100 पेक्षा जास्त तलाठ्यांचा कोरोनाने मृत्यू, विम्याचे कवच देण्याची तलाठी महासंघाची मागणी
आरोग्य यंत्रणेबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या तलाठ्यांना विमा कवच देण्याची मागणी राज्य तलाठी महासंघाकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलीय. कोरोनाच्या या संपूर्ण काळात राज्यभरातील तब्बल 100 पेक्षा जास्त तलाठी आपले कर्तव्य बजावत असताना कोरोना होऊन मृत्युमुखी पडले आहेत.
परभणी : मागच्या दीड वर्षाच्या आरोग्य यंत्रणेबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या तलाठ्यांना विमा कवच देण्याची मागणी राज्य तलाठी महासंघाकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलीय. कोरोनाच्या या संपूर्ण काळात राज्यभरातील तब्बल 100 पेक्षा जास्त तलाठी आपले कर्तव्य बजावत असताना कोरोना होऊन मृत्युमुखी पडले आहेत.
शिवाय अनेक जण कोरोना बाधितही आहेत, एवढे मृत्यू झालेले असताना अद्याप शासनाने तलाठी वर्गाला विमा कवच दिलेलं नाही. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या तलाठ्यांच्या कुटुंबाचे हाल होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तलाठी वर्गाला तात्काळ विमा कवच द्यावे, तसेच फ्रंटलाईन वर्कर म्हणून सर्वांचे लसीकरण करण्यात यावे अशी मागणी राज्य तलाठी महासंघाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement