एक्स्प्लोर
एमआयएम नगरसेवकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिलेची हत्या
एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार करणाऱ्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर यांचा मृतदेह सोलापुरात आढळला

सोलापूर : एमआयएमचे सोलापूर शहराध्यक्ष आणि नगरसेवक तौफिक शेख यांच्याविरुद्ध तक्रार देणाऱ्या काँग्रेस कार्यकर्तीची हत्या झाल्याची घटना विजयपूरमध्ये उघडकीस आली आहे. तौफिक शेख यांच्याविरोधात रेश्मा पडेकनूर यांनी 17 एप्रिल रोजी विनयभंग केल्याची तक्रार दिली होती.
काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर आणि एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांच्यामध्ये मागील काही वर्षांपासून वाद सुरु होता. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान रेश्मा यांनी तौफिक शेख यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. त्यानंतर काही दिवसांनी त्या बेपत्ता झाल्या.
VIDEO | हळदीला लग्नाच्याच मंडपात वादावरुन दोघांची निर्घृण हत्या | स्पेशल रिपोर्ट
विजयपूरजवळ असलेल्या कोलार गावात काल संध्याकाळी सात वाजता रेश्मा यांचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून विजयपूरमध्ये शवविच्छेदनसाठी आणण्यात आला आहे.
दरम्यान, रेश्मा पडनेकूर यांच्या हत्येप्रकरणी नगरसेवक तौफिक शेख यांच्यावर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. तौफिक शेख यांनी रेश्मा यांच्याकडून 13 लाख रुपये घेतले होते, पैसे परत करण्याच्या बहाण्याने रेश्मा यांना घरातून बाहेर नेऊन त्यांची हत्या केल्याचा आरोप रेश्मा यांचे पती बंदेनवाज पडनेकूर यांनी पोलिसात केला आहे. मात्र आरोपी तौफिक शेख सध्या परागंदा आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
