एक्स्प्लोर

सरकारमध्ये काँग्रेस राहणार की नाही? नाना पटोलेंनी थेटच सांगितलं; 'येणाऱ्या काही दिवसात...'

नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) आरोपांचा सपाटा सुरुच ठेवला आहे. आज देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपला मदत केल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे.

Congress Nana Patole On NCP : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) आरोपांचा सपाटा सुरुच ठेवला आहे. आज देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपला मदत केल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. सोबतच महाविकास आघाडीसोबत सत्तेत राहण्याबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी आज बोलताना म्हटलं की,  गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भाजपला मदत करण्याचा राजकारण करत आहे. अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनलं होतं त्याचा उल्लंघन होत आहे.त्यामुळे आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अपमान होत असून आम्ही ते सहन करणार नाही. पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीच्या भूमिकेची आम्ही तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठी लवकरच त्या तक्रारीबद्दल निर्णय घेतील. येणाऱ्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील. आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे का? या प्रश्नावर बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला परिणाम दिसतीलच, आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही.

काँग्रेसला देशाची चिंता आहे 

काँग्रेसच्या शिबिराविषयी सांगताना ते म्हणाले की, काँग्रेसला देशाची चिंता आहे सध्या देशात राज्यघटना तसेच लोकशाही धोक्यात आली आहे. श्रीलंकेसारखी स्थिती होत आहे आणि त्यावरच काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये चर्चा झाली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये 50 टक्के तरुणांना संधी देऊ, एक परिवार एक तिकीट याची अंमलबजावणी महाराष्ट्रात आगामी निवडणुकीपासून होणार आहे.  2 ॲाक्टोबरपासून काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार आहे.

जे लोक माझ्याबद्दल बोलतात, त्यांनी आपली पार्श्वभूमी तपासावी

सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस नेत्यांनी सरकारबद्दल नाराजी असेल तर शरद पवार यांची भेट घ्यावी असं सांगितलं होतं. त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की,  गरज असेल तेव्हा शरद पवार साहेब यांना भेटणार आहे.  अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, नाना पटोले लोकांसाठी जगणारा कार्यकर्ता असून ते देशाला माहित आहे, मी भाजप सोडली, ती समोरून राजीनामा दिला. जे लोक माझ्याबद्दल बोलतात, त्यांनी आपली पार्श्वभूमी तपासावी. पहाटेच्या शपथविधी बद्दल वेळ आल्यावर दादा बोलणार असं बोलले त्यांनी लवकर बोलावं. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 'ऐकला चलो रे' वर काँग्रेस ठाम आहे, असंही ते म्हणाले. 

फडणवीसांच्या आरोपावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील सरकारला जर बाबरी मशीद बोलतात, हे सरकार बाबरी मशीदीप्रमाणे पाडण्याची भाषा करतात. तेव्हा सत्तेसाठी त्यांची मानसिकता कशी आहे हे दिसून येत आहे. लोकशाहीतून निवडून आलेल्या सरकारबद्दल विवादित वक्तव्य करणे हा लोकशाहीचा खून आहे, असं ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Nana Patole : पाप लपवण्यासाठी राष्ट्रवादीचे अयशस्वी प्रयत्न, नाना पटोलेंचा हल्लाबोल ABP Majha

Ajit Pawar On Nana Patole :नाना पटोलेंनी पक्ष किती वेळा बदलला तपासावं मग खंजीर खुपसण्याबद्दल बोलावं

Nana Patole : राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला; जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर नाना पटोले यांचं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं, पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं, पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट  झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 03 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सPune Money Seized : कारमध्ये सापडलेल्या 5 कोटींवरून आरोप प्रत्यारोपTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 22 ऑक्टोबर  2024 : ABP MajhaDhananjay Mahadik : चिरंजीव कृष्णराज महाडिकांच्या उमेदवारीसाठी धनंजय महाडिक सागरवर साखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं, पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं, पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाच्या बैठका सुरु, निवडणुकीनंतर हे एकत्र येतील, प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्पोट
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मुंडेच वरचढ, जिल्ह्यातील राजकीय घराणेशाहीचा बीड पॅटर्न; 2024 च्या निवडणुकीतही नातीगोतीच
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट  झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
मोठी बातमी : लॉरेन्स बिश्नोईला विधानसभा लढण्याची ऑफर, थेट झिशान सिद्दिकींविरोधात मैदानात उतरवण्याची तयारी!
मोठी बातमी : पंकजा मुंडेंची साथ सोडली, भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!
मोठी बातमी : पंकजा मुंडेंची साथ सोडली, भाजप जिल्हाध्यक्षाचा राजीनामा, राजेंद्र मस्के शरद पवारांच्या राष्ट्रवादीत!
महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?
महाविकास आघाडीची आज महत्वाची  बैठक, जागावाटपाचं सुत्र ठरलं, कोणता पक्ष किती जागा लढवणार?
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
Belapur Vidhan Sabha: संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
संदीप नाईकांनी अख्ख्या पायदळासोबत शरद पवार गटात प्रवेश केला, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंसमोर तगडं आव्हान?
Embed widget