Nana Patole : 'राष्ट्रवादीचं भाजपशी साटंलोटं, काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न'; नाना पटोलेंचा हल्लाबोल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर (Sharad Pawar and Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
![Nana Patole : 'राष्ट्रवादीचं भाजपशी साटंलोटं, काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न'; नाना पटोलेंचा हल्लाबोल Congress Nana Patole On NCP Sharad Pawar Ajit Pawar Maharashtra Politics Nana Patole : 'राष्ट्रवादीचं भाजपशी साटंलोटं, काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न'; नाना पटोलेंचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/15/a9a97d01b00cc83e5c545d4589779ced_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nana Patole On NCP : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शरद पवार आणि अजित पवारांवर (Sharad Pawar and Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादीचा भाजपसोबत मिळून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आहे. तर पवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. राष्ट्रवादीचं भाजपशी साटंलोटं असून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न आहे, अशा शब्दात नाना पटोलेंनी हल्लाबोल केला आहे. उदयपूरमध्ये काँग्रेसचं नवसंकल्प शिबिर सुरु आहे. याठिकाणी एबीपी माझाशी बोलताना पटोले यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांनी नुकतंच नाना पटोलेंचं खंजीर खुपसण्याचं वक्तव्य हास्यास्पद असल्याचं म्हटलं होतं. तसंच पटोलेंनी पक्ष किती वेळा बदलला तपासावं मग खंजीर खुपसण्याबद्दल बोलावं, असंही अजित पवारांनी म्हटलं होतं. त्यावरुन पटोलेंनी हा हल्लाबोल केला आहे.
पवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहिती
पटोले यांनी म्हटलं की, पवार कुटुंबाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. त्यांचे पाप लपविण्यासाठी त्यांच्याकडून काँग्रेसवर आरोप करण्यात येत आहे. मी कुणावर टीका करणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. 2010 पासूनची यादी राष्ट्रवादी काँग्रेसकडून वाचून दाखवण्यात आली असती तरी ती केवळ राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्यामुळेच असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. ज्या लोकांचा ते उल्लेख करताय ती लोक आज भाजपमध्ये आहेत. म्हणून राष्ट्रवादीकडून दाखवण्यात येणारी यादी म्हणजे आपले पाप लपविण्यासाठी केलेला एक अयशस्वी प्रयत्न आहे, असंही पटोले म्हणाले.
नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादीच्या पूर्व इतिहासात मला जायचे नाही, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माझ्यावर व्यक्तिगत टीका केली आहे. मला त्यांच्या व्यक्तिगत गोष्टीवर जायचे नाही. मात्र पवार परिवार राजकीय व्यवस्थेत कसे आहेत हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळं मला त्यावर बोलायचं नाही, असे म्हणत नाना पटोलेंनी निशाणा साधला आहे.
नाना पटोलेंनी म्हटलं की, पहाटेच्या शपथविधीनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सोनिया गांधींनी महाविकास आघाडीचा निर्णय घेतला, तो आम्ही पाळला आहे. मात्र राष्ट्रवादी भाजपला वाढविण्यासाठी त्यांच्याशी साठंगाठं करीत काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांचा आम्ही विरोध करतो असा टोला नाना पटोंलेंनी पवारांना लगावला आहे. राज्यात पाप राष्ट्रवादी लपविण्याचे प्रयत्न करते आहे, असंही ते म्हणाले. माझा इतिहास अजित पवारांनी काढला असेल, मात्र माझी समोरूनची लढाई असते, मी मागून लढत नाही आणि पवारांचा इतिहास सर्वज्ञात आहे. त्यामुळे मला त्यात पडायचे नाही असे म्हणत येणाऱ्या निवडणुकात योग्य निर्णय हायकंमाड करेल असंही त्यांनी म्हटलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Nana Patole : पाप लपवण्यासाठी राष्ट्रवादीचे अयशस्वी प्रयत्न, नाना पटोलेंचा हल्लाबोल ABP Majha
Ajit Pawar On Nana Patole :नाना पटोलेंनी पक्ष किती वेळा बदलला तपासावं मग खंजीर खुपसण्याबद्दल बोलावं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)