एक्स्प्लोर
हम वफा कर के भी उनके नजरों से गिर गये, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल राजीनाम्याच्या तयारीत
30 डिसेंबर 2019 रोजीच ठाकरे सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रीमंडळ विस्तार झाला होता. यावेळी 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती.
जालना : शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे जालन्यातील आमदार कैलास गोरंट्याल हे देखील राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. "हम वफा कर के भी उनके नजरों से गिर गये," अशा शब्दात कैलास गोरंट्याल यांनी आपली नाराजी व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांनी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा पराभव केला होता. परंतु मंत्रीमंडळ विस्तारात मंत्रीपद न मिळाल्याने ते नाराज आहेत. 30 डिसेंबर 2019 रोजीच ठाकरे सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रीमंडळ विस्तार झाला होता. यावेळी 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती.
ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारानंतर महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. कॅबिनेट मंत्रीपदाऐवजी राज्यमंत्रीपद मिळाल्याने नाराज असलेले शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी आज राजीनामा दिला. आता काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल हे देखील राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
"पक्षाच्या पडत्या काळात मी काँग्रेससोबत राहिलो. संकटाच्या काळात मातब्बर नेते दुसऱ्या पक्षात गेले. तेव्हाही मी जिल्ह्यात काँग्रेस जिवंत ठेवली. राज्यमंत्री अर्जुन खोतकरांचा विक्रमी मतांनी पराभव केला आणि तिसऱ्यांदा विधासभेवर निवडून आलो. मात्र तरीही पक्षाने माझा विचार केला नाही. आता कार्यकर्ते जे निर्णय घेतील तो मला मान्य आहे. हम वफा कर के भी उनके नजरों से गिर गये," अशा शब्दात कैलास गोरंट्याल यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
नाराज आमदार भाजपच्या संपर्कात : सूत्र
भाजप नाराज आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचं सत्ता स्थापन झाल्यानंतर वारंवार भाजपच्या गोटातून वारंवार म्हटलं जात होतं की, मंत्रीमंडळ विस्तार होऊ द्या, त्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. कोणाला मंत्रीपद मिळतं, कोणाला नाही यानुसार नाराजांना कसं कुरवाळता येईल, त्यांना आपल्याकडे कसं घेता येईल, याबाबत भाजपमध्ये हालचाली सुरु झालेल्या होत्या.
संबंधित बातम्या
Abdul Sattar Resigns | बोहल्यावर चढण्याआधी नवरा पळाला : गिरीश बापट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
भारत
भारत
Advertisement