एक्स्प्लोर

अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा

कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज होते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतं.

मुंबई/औरंगाबाद : राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. खातेवाटप होण्यापूर्वीच शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज होते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतं. 30 डिसेंबर 2019 रोजीच ठाकरे सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रीमंडळ विस्तार झाला होता. यावेळी 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये होते. परंतु निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यांना भाजपमध्ये जायचं होतचं. पण स्थानिक समीकरणांमुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांनीच शिवसेनेत पाठवल्याची चर्चा होती. त्यानंतर मंत्रीमंडळ विस्तारात त्यांना कॅबिनेट मंत्रीपद हवं होतं, मात्र राज्यमंत्रीपद मिळालं. यामुळे अब्दुल सत्तार नाराज होते. परिणामी त्यांनी आज राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता सत्तार आमदाराकीचाही राजीनामा देणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे. मंत्रीमंडळ विस्तारानंतर महाविकास आघाडीमध्ये विशेषत: शिवसेनेत नाराजी होती. नुकतेच पक्षात दाखल झालेल्या अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्रीपद दिल्याने शिवसेना नेते नाराज होते. भास्कर जाधव, तानाजी सावंत, दीपक केसरकर यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवले होती. शिवाय टोकाचा निर्णय घेऊ असंही म्हटलं होतं. दरम्यान, अर्जुन खोतकर यांनी अब्दुल सत्तार यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले. औरंगाबादमधील अतिथी हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांची बैठक झाली, परंतु त्यांची समजूत काढण्यात खोतकरांना यश आलं नाही. सत्तार यांची भेट घेऊन खोतकर माघारी परतले. सत्तार नाराज असल्याने त्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठवल्याचं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं. भाजपची प्रतिक्रिया जनादेशाचा अवमान करणाऱ्यांनी, सत्तेसाठी काहीही निर्णय घेत सरकार स्थापन केलं तेथे असंच होणार होतं, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. तर आज दिवसभरात अशा बऱ्याच बातम्या मिळतील, असं सूचक वक्तव्य भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. नाराज आमदार भाजपच्या संपर्कात : सूत्र भाजप नाराज आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचं सत्ता स्थापन झाल्यानंतर वारंवार भाजपच्या गोटातून वारंवार म्हटलं जात होतं की, मंत्रीमंडळ विस्तार होऊ द्या, त्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील. कोणाला मंत्रीपद मिळतं, कोणाला नाही यानुसार नाराजांना कसं कुरवाळता येईल, त्यांना आपल्याकडे कसं घेता येईल, याबाबत भाजपमध्ये हालचाली सुरु झालेल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan discharged from hospital : चेहऱ्यावर स्मित हास्त ठेवून सैफची घरात एंट्री #abpमाझाWalmik Karad CCTV : देशमुखांच्या हत्येआधी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये भेट, कराड उपस्थित; ऑफिसबाहेरुन Exclusive आढावाSaif Ali Khan Discharged : सैफ अली खानला डिस्चार्ज, Lilavati रुग्णालयातून घरी दाखल, EXCLUSIVE दृश्येSaif Ali Khan Discharge : व्हाईट शर्ट, डोळ्यांना गॉगल; ६ दिवस उपचार घेऊन सैफ घरी परतला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला दत्तात्रय मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Davos : दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार गडचिरोलीसाठी, कल्याणी उद्योग समूहाकडून पोलाद उद्योगामध्ये 5,200 कोटींची गुंतवणूक
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात 'दे धक्का'; राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार?
Maharashtra Politics: शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
शिवसेनेपाठोपाठ पालकमंत्रीपद वाटपावरून राष्ट्रवादीतही धुसफूस;स्वजिल्हे न दिल्याने मंत्र्यांमध्ये नाराजीचा सुर
Embed widget