एक्स्प्लोर

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली दंगली घडवण्याचे षडयंत्र; दंगेखोरांना अद्दल घडवा: नाना पटोले

Nana Patole : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. 

Nana Patole : राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात पण त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक सलोखा बिघडवण्याचे पाप केले जात आहे. तेही केवळ राजकीय फायद्यासाठी, हे अत्यंत दुर्देवी आणि चिंताजनक आहे. विशाळगड हिंसाचाराचे प्रकरण हे महाराष्ट्राला काळीमा फासणारे आहे. विशाळगडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली गजापूर गावात एकाच धर्माच्या लोकांवर हल्ले करून त्यांच्या घरांची, दुकानांची व मालमत्तांचे प्रचंड नुकसान करण्यात आले. झुंडशाहीचा हा प्रकार महाराष्ट्राला शोभणारा नाही, या दंगेखोरांच्या तात्काळ मुसक्या आवळा, व कठोर कारवाई करावी अशी मागणी  नाना पटोले यांनी केली आहे. 

विशाळगड प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना  लिहिलेल्या पत्रात म्हटलेय की, महाराष्ट्र ही साधू संतांची, थोर पुरुषांची, विचारवंत व समाजसुधारकांची भूमी आहे. शिव- शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे पुरोगामी राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे. पण गेल्या काही दिवसांपासून आपल्या राजकीय फायद्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही नेते प्रक्षोभक वक्तव्ये करून राज्यात हिंदू मुस्लीम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणिवपूर्वक करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रकार अत्यंत घातक व महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणारा आहे.

विशाळ गडावरील अतिक्रमणे काढली पाहिजेत याबाबत कुणाच्याही मनात दुमत नाही. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड किल्यांचा वारसा जपला पाहिजे. अतिक्रमणाचे हे प्रकरण न्यायालयात गेलेले आहे, न्यायालयातील सुनावणीवेळी सरकारी वकील उपस्थित नसतात, सरकार पक्षाकडूनच वेळकाढूपणा केला जात असताना अचानक अशा काही हालचाली करून अतिक्रमणचा मुद्दा चव्हाट्यावर आणला गेला. विशाळ गडावरील अतिक्रमणाच्या नावाखाली १४ तारखेला विशाळगडापासून ४ किलोमीटर दूर असलेल्या गजापूर गावातील एका धर्माच्या लोकांच्या घरांवर हल्ले करण्यात आले, मारहाण करण्यात आली. हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे. विशाळगडावरील अतिक्रमण व गजापूर गावातील दंगल हे दोन्ही वेगळे विषय आहेत. या प्रकरणी गृहमंत्री फडणवीस यांनी केलेले विधान राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी वा दंगेखोरांवर कारवाई करण्यासंदर्भातील नसून विशिष्ट धर्माला भिती घालण्याचे व या प्रकरणाला वेगळा रंग देणारे आहे, गृहमंत्र्यांचे विधान हे एकप्रकारे दंगेखोरांना पाठीशी घालणारे आहे, आम्ही या विधानाचाही निषेध करतो. 14 जुलै रोजी जो हिंसाचार झाला ते सरकार आणि प्रशासनाचे फक्त अपयशच नाही तर प्रशासनाच्या पाठबळाने झालेला गुन्हा आहे. 

माजी छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात हाक दिली होती. त्यासाठी हजारो तरुण विशाळगडाकडे येणार, याची कल्पना असूनही प्रशासन आणि पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही. गजापूर गावातील ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारने तातडीने मदत केली पाहिजे तसेच प्रचंड दहशतीत असलेल्या गावकऱ्यांना सरकारने विश्वास दिला पाहिजे. सरकारने या संदर्भात सखोल चौकशी करून दोषी अधिका-यांवरही कारवाई केली पाहिजे. राज्यात सामाजिक सलोखा व शांतता रहावी यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून अशा अपप्रवृत्तींना पायबंद घालण्याची आपली जबाबदारी आहे. राजकीय फायद्यासाठी कोणी धर्माच्या नावाखाली वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते कदापी खपवून घेतले जाणार नाही. राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी या अपप्रवृत्तींना ठेचून काढा, असेही नाना पटोले म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 8PM 25 March 2025Job Majha : NMDC स्टील लिमिटेड येथे विविध पदांसाठी नोकरीच्या संधी : 25 March 2025 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 7PM 25 March 2025Majha Mudda EP 06 : औरंगजेबची कबर ते वाघ्या कुत्रा प्रकरण, महत्वाच्या मुद्द्यांपासून नेते भरकटतायत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
कुणाल कामराने अजित पवारांना वादात ओढलं; जुन्या व्हिडिओवर उपमुख्यमंत्र्यांची नवी प्रतिक्रिया
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
विठ्ठल रुक्मिणीची ऑनलाईन पूजा काही तासांतच फुल्ल, पहिल्याच दिवशी पंढरपूर मंदिराला मिळाले 75 लाख रुपये
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
'नाद' खुळा... दारुच्या एका बॉटलवर एक फ्री, दुकानांबाहेर ऑफर्सचे बोर्ड; ग्राहकांची गर्दी, बॉक्स भरुन नेले
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
चकमकीत तीन नक्षलवादी ठार, 25 लाख बक्षीस असलेल्या मुरलीचा खात्मा; बस्तर फायटरची मोठी कारवाई
Nanded turmeric cooker Blast: आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
आष्टीत हळद शिजवताना कुकरचा भीषण स्फोट, दाबामुळे 600 फूटापर्यंत पार्ट उडाले, 4 शेतकरी जखमी
Stock Market Update : शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, घसरणीच्या काळात कोणत्या शेअरमध्ये तेजी?
शेअर बाजारातील तेजीला सातव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांचे 350000 कोटी बुडाले, कारण समोर
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, पाया पडू नका; अजित पवारांचा मोलाचा सल्ला
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत
Embed widget