एक्स्प्लोर

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचं आंदोलन; महाराष्ट्रासह इतर राज्यात कार्यकर्ते आक्रमक

जीवनावश्यक वस्तुंसोबतच पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसकडून आज आंदोलन देशासह राज्यभरात आंदोलनं सुरु आहेत. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनं केली.

मुंबई : कोरोना काळात देशावर इंधन दरवाढीचं संकट गडद होत चालंलं आहे. कोरोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच अनलॉक-1 नंतरही अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली आहे. देशात पेट्रोल-डिझेल दर वाढ सातत्याने सुरू असल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. देशभरात विविध ठिकाणी आज काँग्रेसकडून इंधन दरवाढीविरोधात आणि केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात येत आहेत.

पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ केली गेली आहे. कोरोनामुळे झालेली अर्थव्यवस्थेची तूट भरून काढण्यासाठी इतर देश थेट देशाच्या तिजोरीतून लोकांना मदत करत आहे. मात्र आपलं केंद्र सरकार अतिरिक्त कर लावून लोकांकडूनच वसूली करत आहे, असा आरोप करत महाराष्ट्र काँग्रेसने सोमवारी राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली.

पुण्यातही काँग्रेसच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातील आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली. राजधानी दिल्लीसह अहमदाबाद, पटणा, बंगळुरू आदी प्रमुख शहारांमध्ये काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलनास सुरूवात झाली आहे.

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचं आंदोलन; महाराष्ट्रासह इतर राज्यात कार्यकर्ते आक्रमक

पुण्यात काँग्रेस आक्रमक

काँग्रेसच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातल्या आंदोलनाला पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. पुण्यातील काँग्रेसच्या पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधातल्या आंदोलनला पोलिसांची परवानगी दिलेली नव्हती. अर्ज देऊनही पोलिसांनी त्यावर कोणताच निर्णय घेतलेला नाही.

इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे अमरावतीत आंदोलन

देशात दररोज पेट्रोल डिझेलचे दर वाढत असल्याने आज काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे आज अमरावतीत काँग्रेसच्यावतीने अमरावतीच्या इर्विन चौकात धरणे आंदोलन सुरु केले आहेत. इंधन दरवाढीचे फलक हातात घेऊन केंद्र सरकारचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी इंधनाचे दर कमी करा अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित आहेत.

पाहा व्हिडीओ : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलला GST च्या कक्षेत आणावं : सत्याजीत तांबे

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मनमानडमध्ये काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर

केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात आज मनमाडमध्ये काँग्रेस तर्फे जनआंदोलन करण्यात आले. आधीच देशातील नागरिक कोरोनामुळे अडचणीत आले असताना केंद्र सरकारने गेल्या 19 दिवसांपासून दररोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढवीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी असताना केंद्र सरकार दरवाढ करीत असल्याने सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. केंद्र सरकारच्या अन्यायकारक पिळवणुकी विरोधात काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येऊन सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

औरंगाबादमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सोशल डिस्टंसिंग ठेवत हे आंदोलन केलं. पेट्रोल ,डिझेल दरवाढीचा निषेध करणारे बॅनर हातात घेऊन कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आंदोलनात महिलांचा देखील समावेश होता. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि दरवाढीचा निषेध केला.

पाहा व्हिडीओ : इंधन दरवाढीविरोधात लॉकडाऊननंतर हजारोंचे मोर्चे काढण्याची तयारी : सतेज पाटील

गडचिरोलीतही काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन

गडचिरोलीत काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंधन दरवाढीवरून स्थानिक गांधी चौकात धरणे आंदोलन करत मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचा केला आरोप करण्यात आला. कोरोना काळात उत्पन्न नसताना इंधन दर वाढवून सामान्य माणसाचे कंबरडे मोडल्याचा दावा काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. तातडीने इंधन दरवाढ मागे घेण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे.

लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी सायकलस्वारी

देशात मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झालेली पहावयास मिळत आहे. या दर वाढीवर केंद्र सरकार नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरली आहे. याचा निषेध करण्यासाठी आज काँग्रेस पक्षाकडून वेगवेगळी आंदोलन करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून लातूर काँग्रेस पक्षाकडून ही आंदोलन करण्यात येत आहेत. लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी सायकल रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यलय गाठले आहे. लातूर शहरातील काँग्रेस भवणातून ही रॅली निघाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी यांना दरवाढी बाबत निवेदन यावेळी देण्यात आले

देशभरातही ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

अहमदाबादमध्येही कार्यकर्त्यांनी आक्रमक होत आंदोलन केलं. आक्रमक झालेल्या आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करावा लागला. बंगळुरूमध्ये काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी सायकल चालवत आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांसह रवाना झाले.

महत्त्वाच्या बातम्या : 

भाजपच्या आरोपांवर काँग्रेसचा पलटवार; चिनी कंपन्यांनी पीएम केअर्स फंडला कोट्यवधींचा निधी दिला का? : बाळासाहेब थोरात

विधान परिषदेसाठी काँग्रेस पक्षाला चार जागा मिळण्याची आशा; प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
Embed widget