एक्स्प्लोर
विधान परिषदेसाठी काँग्रेस पक्षाला चार जागा मिळण्याची आशा; प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचं वक्तव्य
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या एकूण जागांपैकी 4 जागा काँग्रेस पक्षाला मिळण्याची आशा, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली. संगमनेर येथे एका शोरुमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
संगमनेर : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या एकूण जागांपैकी 4 जागा काँग्रेस पक्षाच्या वाट्याला येणार असल्याची शक्यता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली आहे. आत्तापर्यंत 350 जणांची यादी माझ्याकडे आली असल्याचं त्यांनी सांगितलंय. संगमनेर शहरातील ट्रॅक्टरच्या शोरुम उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कोरोना संसर्गाला सोप्प समजण्याची चूक न करण्याचं आवाहन महसूल मंत्री थोरात यांनी भाषणातून केलं.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज संगमनेर या आपल्या मतदार संघात दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते शेम्प्रो या संस्थेच्या इमारत व ट्रॅक्टर शो रुमचा उद्घाटन सोहळा पार पडला. नियोजित वेळेपेक्षा जास्त उशीर झाल्यानंतर थोरात यांनी उशीर होण्या मागचं कारण भाषणातून सांगितलं. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या एकूण जागांपैकी 4 जागा काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याची शक्यता बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवली. आत्तापर्यंत 350 जणांची यादी माझ्याकडे आली असल्याच सांगत आजही अनेक इच्छुक आले असल्यानं कार्यक्रमाला उशीर झाल्याचं स्पष्ट केलं.
विधानपरिषदेचा तिढा सोडवण्यासाठी सेना -भाजपची अंडरस्टँडिंग?
कोरोना संसर्गाला हलक्यात घेऊ नका
कोरोना संसर्गाला सोप समजू नका. कोरोना आपल्याला होत नाही तोपर्यंत काही होत नाही, असं समजून वागू नका. एकदा कोरोना झाला की घशात नळ्या घालण्याची वेळ येते हे ध्यान्यात ठेवा. खुर्च्या मांडल्या म्हणून तुम्ही गर्दी केली. मात्र, काळजी घेण्याचं आवाहन थोरात यांनी यावेळी केलं. दरम्यान या उद्घाटन सोहळ्यास नागरिकांनी गर्दी केली होती. विवाह सोहळे व अंत्यविधीसाठी मोजक्या लोकांना मुभा दिली जात असताना उद्घाटन सोहळ्याला मात्र शंभराहून अधिक नागरिक उपस्थित होते हे विशेष.
काय आहे विधानपरिषदेचं पक्षीय बलाबल?
राष्ट्रवादी काँग्रेस - 10
काँग्रेस - 8
शिवसेना - 14
भाजप - 23
लोकभारती - 1
शेतकरी कामगार पक्ष - 1
राष्ट्रीय समाज पक्ष - 1
अपक्ष - 6
रिक्त - 14
एकूण - 78
निवृत्त होणारे राज्यपाल नामनियुक्त सदस्य
काँग्रेस
हुसनबानू खालीफे - 6 जून
अनंत गाडगीळ - 15 जून
जनार्दन चांदूरकर - 6 जून
आनंदराव पाटील - 6 जून
रामहरी रूपनवर - 6 जून
राष्ट्रवादी
प्रकाश गाजभिये - 6 जून
विद्या चव्हाण - 6 जून
ख्वाजा बेग - 6 जून
जग्गनाथ शिंदे - 6 जून
राहुल नार्वेकर - 6 जून
रामराव वडकुते - 6 जून
पीपल्स रिपब्लिकन पार्टी
जोगेंद्र कवाडे - 15 जून
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement