एक्स्प्लोर

दोन गावांचा वाद, आंबोली धबधब्याचं नाव बदलण्याच्या हालचाली

आंबोलीचा धबधबा हा पारपोली गावाच्या हद्दीत येतो. मात्र या धबधब्याला आंबोली गावाचं नाव आहे. हा धबधबा आपल्याच हद्दीत आहे असा दोन्ही गावांचा दावा आहे.

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्षा पर्यटनाचा मानबिंदू असलेला आंबोलीचा धबधबा पुन्हा चर्चेत आला आहे. दोन गावांच्या सीमावादावरुन या धबधब्याचे नाव बदलण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याला कारण ठरलंय ते करातून जमा होणारी मोठी रक्कम. आंबोलीचा धबधबा हा पारपोली गावाच्या हद्दीत येतो. मात्र या धबधब्याला आंबोली गावाचं नाव आहे.  हा धबधबा आपल्याच हद्दीत आहे असा दोन्ही गावांचा दावा आहे. गेल्या वर्षीपासून आंबोली आणि पारपोली या दोन ग्रामपंचायतींना जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांच्या त्यांच्या हद्दीत पर्यटन कर वसूल करण्यास परवानगी दिली. त्यानुसार पारपोली ग्राम पंचायतीने मुख्य धबधब्याजवळ करवसुली केली. त्यातून सुमारे 10 ते 11 लाख रुपये जमा झाले. याच रकमेमुळे वादाला तोंड फुटलं. पारपोली ग्राम पंचायतीने या धबधब्याचं नाव स्वत:च्या गावावरुन ठेवण्याच्या हालचाली सुरु केल्या. त्यासाठी गोपनिय बैठका सुरु आहेत. याला आंबोली ग्रामस्थांचा विरोध असून काही झाले तरी आम्ही नाव बदलू देणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे. पारपोली गावकऱ्यांनी ‘शिवतीर्थ धबधबा पारपोली’ असं नवं नाव सुचवलं आहे. आंबोली घाटाला आणि येथील वर्षा पर्यटनाला मुख्य आंबोलीच्या धबधब्यामुळे ओळख मिळाली आहे. हा धबधबा आता जगाच्या नकाशावर झळकला आहे. त्यामुळे दिवसाकाठी हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देतात. मात्र यावर्षीपासून आंबोली धबधब्याच्या या विकासात सीमावाद आला आहे. आंबोली धबधब्याला भेट देणार्‍या पर्यटकाडून प्रत्येकी दहा रुपये, पर्यटन कर घेण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याची अंमलबजावणीही सुरु झाली. या पावसाळ्याच्या अखेरीस त्याठिकाणी नेमण्यात आलेल्या समितीकडे दहा लाखाहून अधिक रक्कम कराच्या स्वरुपात गोळा झाली आहे. येणार्‍या काळात हा आकडा वाढणार आहे. त्यातून मिळणारे लाखो रुपये हाच कळीचा मुद्दा ठरला आहे. तो धबधबा आपल्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात आहे. त्यामुळे यातून मिळणारे उत्पन्न आपल्यालाच मिळावे, असा प्रयत्न पारपोली आणि आंबोली या दोन्ही ग्रामपंचायतीकडून सुरू करण्यात आला आहे. वनविभाग आणि महसुल विभागाने कागदपत्राच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार आंबोली धबधबा हा पारपोली गावच्या हद्दीत येत असल्यामुळे, त्याची देखरेख आणि मिळणारे उत्पन्न आमच्या ग्रामपंचायतीला देण्यात यावे, अशी मागणी पारपोली ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. एवढ्यावरच न थांबता थेट या धबधब्याचे नाव ‘शिवतीर्थ धबधबा पारपोली’ असे करण्याच्या प्रयत्न, पारपोली गावकऱ्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Speech Independence Day : युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
युवकांसाठी AI कौशल्य प्रशिक्षण, मोफत कोचिंग ते सेमीकंडक्टर चीप अन् अणुउर्जेचा मास्टरप्लॅनपर्यंत; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे!
Sandeep Kshirsagar: ‘सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
'सुनेत्राताईंनी पीएच्या मनावर कारभार करू नये’; निधी वाटपावरून संदीप क्षीरसागर संतापले, ध्वजारोहणाचे निमंत्रण न मिळाल्याने उघड नाराजी
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
PM Modi Independence Day speech: उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!
उत्पादनापासून हरित अर्थव्यवस्थेपर्यंत, 'विकसित भारता'साठी पंतप्रधानांची 7-सूत्री 'सप्तधारा संकल्पना, Gen-Z साठीही मोठी घोषणा!

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य सहजपणे मिळालं का? शहीदांच्या समर्पणामुळेच आपल्याला स्वातंत्र्य, त्याचं महत्त्व जाणलं पाहिजे: नाना पाटेकर
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Embed widget