माझ्या जीवाला काही झाल्यास आमदार रवी राणा जबाबदार; संकल्प शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची पोलिसांत तक्रार
माझ्या जिवाला उद्या काही कमी जास्त झालं तर त्याला सर्वस्वी आमदार रवी राणा हे जबाबदार राहतील. शिवाय पहिले आरोपीही तेच राहतील, अशी लेखी तक्रार संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केली आहे.
Amravati News अमरावती : माझ्या जिवाला उद्या काही कमी जास्त झालं तर त्याला सर्वस्वी आमदार रवी राणा (Ravi Rana) हे जबाबदार राहतील. शिवाय पहिले आरोपीही तेच राहतील, अशी लेखी तक्रार संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी केली आहे. नितीन कदम यांनी अमरावतीच्या (Amravati News) फेजरपुरा पोलीस ठाण्यात आमदार रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यामुळे बडनेरा विधानसभेत निवडणुकीपूर्वीच (Vidhan Sabha Election 2024) राजकीय संघर्ष पेटला असल्याचे चित्र आहे.
लोकसभेत बबली गेली, आता विधानसभेत बंटी घरी जाणार- नितीन कदम
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांचे काल नितीन कदम यांनी संकल्प शेतकरी संघटनेकडून जंगी स्वागत केले होते. तेव्हा रोहित पवारांच्या स्वागताचे बॅनरही ठीकठिकाणी लावले होते. मात्र, आमदार रवी राणा यांच्या सांगण्यावरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडल्याचा नितीन कदमांनी आरोप केलाय. सोबतच लोकसभेत बबली गेली, आता विधानसभेत बंटी घरी जाणार अशी टीकाही नितीन कदमांनी केली आहे. मला जर बडनेरा विधानसभेसाठी महाविकास आघाडी मधून उमेदवारी मिळाली नाही तर मी अपक्ष निवडणूक लढवणार, असा निर्धारही कदमांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले नितीन कदम
आम्ही संकल्प शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून शेतकरी, लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम करित आहोत. जनेतेत राहुन गोर गरिबांच्या समस्या आम्ही सोडवित आहोत. मात्र काल 26 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास आमदार रोहीत पवार हे अमरावती दौऱ्यावर असल्याने आम्ही संकल्प शेतकरी संघटनेतर्फे त्यांचे स्वागत नवाये चौकात करणार होतो. त्याकरीता आम्ही चौकात त्यांच्या स्वगताचे बॉनर लावले होते. मात्र ते बॅनर रवी राणा यांच्या सांगण्यावरुन मानपा यांनी कार्यवाही केली. तसेच आम्ही परत दुपारी स्वगताचे बॅनर लावून स्वागत कार्यक्रम घेतला. कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरी परत गेलो असता रात्रीच्या सुमारास रुख्मीनी नगर येथील ऑफिस येथे काही पोलीस आले आणि त्यांनी मला सांगितले कि, माझ्यावर युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांकडुन हमला होणार आहे. त्याकरीता आपल्या सुरक्षेच्या अनुषंगाने येथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला.
आम्ही सकाळी आठ वाजताच्या सुमारास घरी असताना आम्हाला माहीती झाले कि, आमदार रवी राणा यांच्या सांगण्यावरून त्यांचे पक्षाचे कार्यकर्ते अश्विन उके, वैभव गोसामी यांनी सोशल मिडियावर व्हिडीओ वायरल करुन माझी बदनामी केली आणि मला अश्लील भाषेत शिवीगाळ केली, सोबतच मला जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. त्याकरीता त्यांच्या कार्यकर्त्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबातील लोकांना धोका निर्माण झाला आहे. त्याकरीता त्यांच्यावर कठोर कारवाई करुन गुन्हा नोंदवण्याची आम्ही विनंती केली आहे. माझे आणि माझ्या परिवारातील सदस्यास आणि संकल्प शेतकरी संघटनेचे लोकांना काही कमी जास्त झाल्यास यास सर्वस्वी आमदार रवी राणा व त्यांचे कार्यकर्ते जबाबदार राहील, त्याकरिता आम्ही तक्रार डेली असल्याचे नितीन कदम यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा