Fact Check :राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ कट करुन क्लीप पुन्हा व्हायरल करत चुकीचा दावा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Fact Check : राहुल गांधी यांच्या भाषणाच्या भाषणातील व्हिडीओ कट करुन एक क्लीप व्हायरल केली जातेय. या व्हिडीओसोबत दावा करण्यात येतोय तो खोटा असल्याचं समोर आलं आहे.
नवी दिल्ली (Vishvas News) : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर काही नेटकऱ्यांकडून चुकीचे व्हिडीओ शेअर करत टीका करण्यात येत आहे.फॅक्ट चेकमध्ये या व्हिडीओतील सत्य समोर आलं आहे. तो व्हिडीओ वेगवेगळ्या सोशल मीडियावर अकाऊंटवरुन शेअर केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत राहुल गांधी "महात्मा गांधी म्हणायचे, ते सत्याग्रहाची चर्चा करत असतं. सत्याग्रहाचा अर्थ सत्तेच्या रस्त्याला कधीच सोडू नये, सॉरी सत्याचा मार्ग कधी सोडू नये." ही क्लीप व्हायरल करुन राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे. या व्हिडीओचं फॅक्ट चेक विश्वास न्यूजनं केलं असता हे दावे भ्रम निर्माण करणारे असल्याचं समोर आलं. त्याची पडताळणी इथं पाहा.
नेमकं काय व्हायरल होत आहे?
tryfun11 नावाच्या इंस्टाग्राम खात्यावर राहुल गांधी यांचा एक व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आलं आहे."महात्मा गांधी म्हणायचे, ते सत्याग्रहाची चर्चा करत असतं. सत्याग्रहाचा अर्थ सत्तेच्या रस्त्याला कधीच सोडू नये, सॉरी सत्याचा मार्ग कधी सोडू नये.", असं राहुल गांधी म्हणत असल्याचं त्यामध्ये दिसून येते.
व्हायरल पोस्ट इतर काही लोक देखील शेअर करत आहेत. इथं पाहा आर्काइव्ह लिंक
पडताळणी
विश्वास न्यूजनं व्हायरल पोस्टची सत्यता शोधण्यासाठी सर्वप्रथम व्हायरल क्लीपच्या कीफ्रेम्स काढून गुगल लेन्सवरुन सर्च केलं. याबाबत राहुल गांधी यांच्या युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ पाहायला मिळालं असतं.
खऱ्या व्हिडीओत राहुल गांधी यांचं भाषण मिळालं. 28.10 मिनिटानंतर ते म्हणतात की "... यांच्यासाठी एकच शब्द आहे, महात्मा गांधी म्हणायचे, सत्याग्रहाची गोष्ट सांगायचे, सत्याग्रहाचा अर्थ काय, सत्तेचा मार्ग कधीच सोडू नका,सॉरी सत्याचा मार्ग कधीच सोडू नका, यांच्यासाठी एक नवा शब्द आहे. आरएसएस भाजप वाल्यांसाठी... आम्ही सत्याग्रही असून ते सत्ताग्रही आहेत. ते सत्तेसाठी काहीही करतील."
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर स्पष्ट होतं की राहुल गांधी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करत होते. त्यावेळी सत्ताग्रही आणि सत्याग्रह यात राहुल गांधी यांची काही काळासाठी गफलत झाली, ती तातडीनं त्यांनी दुरुस्ती केली. ही व्हिडीओ क्लीप छत्तीसगडमध्ये आयोजित काँग्रेसच्या तीन दिवसांच्या महाअधिवेशनातील राहुल गांधी यांच्या भाषणातील आहे. राहुल गांधी यांचं भाषण 26 फेब्रुवारीला लाइव स्ट्रीम करण्यात आलं होतं.
सर्च करताना आम्हाला न्यूज 18 मध्य प्रदेश-छत्तीसगडच्या वेरिफाइड यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ मिलाला. यात राहुल गांधी यांची जीभ घसरली, सत्याग्रहाचा अर्थ सत्तेचा मार्ग कधी सोडू नका, असं लिहिल्याचं पाहायला मिळालं.
आतापर्यंतच्या पडताळणीत हे स्ष्ट झालं की 2023 मधील काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधी यांच्याकडून सत्ताग्रही आणि सत्याग्रही याचा अर्थ समजावून सांगताना घफलत झाली होती, हे स्पष्ट होतं. त्याचवेळी राहुल गांधी यांनी चूक दुरुस्ती करत माफी मागितली होती. आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झालं की जुनी अर्धवट क्लीप व्हायरल करत राहुल गांधी यांच्या विरोधात दुष्प्रचार करण्याच्या हेतूनं तो शेअर करण्यात आला होता.
विश्वास न्यूजनं यापूर्वीच्या पडताळणासाठी यूपी काँग्रेस प्रवक्ते अभिमन्यू त्यागी यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात अपप्रचारासाठी व्हिडीओ क्लीप व्हायरल केला जात असल्याचं म्हटलं.
पडताळणीत शेवटी पोस्ट व्हायरल करणाऱ्या व्यक्तीची सोशल मीडिया प्रोफाइल पाहिली असताना tryfun11 हे अकाऊंट नोव्हेंबर 2023 ला सुरु करण्यात आलं होतं. याला 98 हजार फॉलोअर्स आहेत.
निष्कर्ष : विश्वास न्यूजच्या पडताळणीत हे दिसून आलं की 2023 मधील फेब्रुवारीतील राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडीओ अर्धवट कट करुन व्हायरल केला जात आहे. राहुल गांधी यांच्या छत्तीसगडमधील भाषणाचा हा व्हिडीओ आहे. राहुल गांधी यांची सत्ताग्रही आणि सत्याग्रही याचं उदाहरण देताना गफलत झाली होती. तेव्हाच त्यांनी दुरुस्ती केली होती. मात्र, सध्याच्या अपप्रचाराच्या हेतूनं व्हिडीओ व्हायरल केले जात आहेत.
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूजवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]