एक्स्प्लोर

मंत्री महोदयांनी घेतली विनोद कांबळींची भेट, रुग्णालयातच ख्रिसमस साजरा; आर्थिक मदत पत्नीकडे सुपूर्द

वानरसेना संघटनेचे अध्यक्ष धनंजय सिंग यांच्यासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत मंत्री सरनाईक यांनी मदतीबाबत चर्चा केली.

ठाणे : भिवंडीतील आकृती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या माजी फलंदाज विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेले काही दिवस कांबळी यांच्यावर विविध प्रकारचे उपचार सुरू आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरुन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन विनोद कांबळी यांची विचारपूस केली तसेच ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, वानर सेना या संस्थेच्या माध्यमातून जवळपास 25 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. तसेच श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने 5 लाख असे एकूण 30 लाख रुपयांची मदत देण्यात आली असून उद्या ही रक्कम त्याच्या पत्नीच्या खात्यात जमा होईल. 

वानरसेना संघटनेचे अध्यक्ष धनंजय सिंग यांच्यासोबत व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत मंत्री सरनाईक यांनी मदतीबाबत चर्चा केली. कांबळी यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. तसेच, विनोद कांबळी हा माझा मित्र असून मी भेट घेऊन त्याच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. तसेच, मैदानावर तू अनेक सेंच्युरी, डबल सेंच्युरी मारल्या आहेत. आता, तुला आयुष्याची सेंच्युरी मारायची आहे, अनेक क्रिकेटर्स घडवायचे आहेत असे प्रताप सरनाईक यांनी विनोदला म्हटले. तसेच, विनोदच्या लग्नाची आठवण सांगताना तो माझा मित्र आहे. यापुढील त्याच्या सर्वच उपचाराची जबाबदारी आम्ही सर्वजण घेत असल्याचंही सरनाईक यांनी म्हटलं.   

रुग्णालयातच ख्रिसमस साजरा होणार

दुसरीकडे भिवंडीतील आकृती हॉस्पिटलमध्ये विनोद कांबळी यांचा उपचार सुरू आहे. मात्र, आज क्रिसमस डे असल्याने हॉस्पिटल प्रशासनाकडून त्यांना एका वेगळ्या रुममध्ये शिफ्ट केलं जाणार आहे. ज्या रूममध्ये ख्रिसमस डे ची संपूर्ण सजावट करण्यात आली आहे, जेणेकरून त्यांना आपण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचा अनुभव न येता आपण घरी क्रिसमस डे साजरा करत असल्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी, हॉस्पिटल प्रशासनाकडून संपूर्ण तयारी केली गेली आहे. 

विनोद कांबळीकडून ख्रिसमसच्या शुभेच्छा

दरम्यान, विनोद कांबळी यांनी आपली प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले तसेच अनेकजण तब्येतीची विचारपूस करण्यासाठी येत आहेत. अनेकांनी मला मदतही केली आहे, त्यांचे सर्वांचे आभार मानत विनोद कांबळीने आज क्रिसमस डे च्या दिवशी सर्व देशवासीयांना व आपल्या चाहत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. 

हेही वाचा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Andheri| भाजपवर निशाणा, शिदेंचा घेतला समाचार, अंधेरी मेळाव्यात ठाकरे कडाडलेEknath Shinde BKC Full Speech : उठाव ते विधानसभेचा निकाल; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजीUddhav Thackeray on BJP | नामर्दाची औलाद, तुमच्याकडून आम्ही हिंदूत्व शिकायचं का? उद्धव ठाकरेUddhav Thackeray on BJP | जयश्री रामनंतर जय शिवराय बोलावच लागेल- उद्धव ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार,  पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
दावोसमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला; 15 लाख 75 हजार कोटींचे करार, पुणे, मुंबईससह राज्यात 16 लाख रोजगार
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
Highcourt: मशिदींवरील भोंग्यांच्या याचिकेवर हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल; न्यायालयाकडून कार्यपद्धती स्पष्ट
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
शेरोशायरी, उद्धव ठाकरेंवर बाण, लाडक्या बहणींचाही सन्मान; बऱ्याच दिवसांंनी एकनाथ शिंदे भाषणात कडाडले
Ajit Pawar: महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
महामंडळांचं वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी; अजित पवारांनी सांगितली तीन नावं
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Embed widget