(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दर्यापूरची जागा ही शिवसेनेला जवळ जवळ सुटल्या सारखी; माजी खासदार आनंदराव अडसूळांनी विधानसभेसाठी दंड थोपटले
Amravati News : लोकसभा निवडणुकीत चुरशीच्या आणि लक्षवेधी ठरलेल्या अमरावती (Amravati) लोकसभा मतदारसंघात आता विधानसभेच्या निवडणुकीतही गाजणार असल्याची शक्यता आहे.
Maharashtra Legislative Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election 2024) वारे वाहू लागले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत चुरशीच्या आणि लक्षवेधी ठरलेल्या अमरावती (Amravati) लोकसभा मतदारसंघात आता विधानसभेच्या निवडणुकीतही गाजणार असल्याची शक्यता आहे. कारण दर्यापूर विधानसभेची (Daryapur Assembly Constituency) जागा ही शिवसेनेला सुटल्या सारखी जमा असल्याचे मोठे विधान शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी केलं आहे.
माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दर्यापूर विधानसभा जागेवर मोठा दावा केला आहे. यावेळी अडसूळ म्हणाले की, दर्यापूरमधून अभिजित अडसूळ हे याआधी इथून निवडून आलेले आहे. परिणामी, दर्यापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही अभिजित अडसूळ यांच्या उमेदवारी बद्दल अनुकूल आहे. त्यामुळे अभिजित अडसूळ हे दर्यापुर मधून विधानसभा लढणार हे जवळपास निश्चित झाले असल्याचा दावा करत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी विधानसभेसाठी दर्यापूरच्या जागेवर मोठा दावा केला आहे.
दर्यापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला- आनंदराव अडसूळ
नुकतेच राज्यपाल पदाच्या नियुक्तीवरुन अमरावतीत महायुतीत चांगलीच खडाजंगी रंगली असल्याचे बघायला मिळाले होते. अशातच शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर निशाणा साधत नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत पुन्हा न्यायालयात आव्हान देण्याचा निर्धार केला होता. त्यांनतर या विषयी बोलताना आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनीही पलटवार करत आनंदराव अडसूळ यांच्यावर बोचरी टीका केली होती.
या शाब्दिक चकमकीत आता अभिजित अडसूळ हे दर्यापुर मधून विधानसभा लढणार हे जवळपास निश्चित झाले असल्याचा दावा करत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी विधानसभेसाठी दर्यापूरच्या जागेवर मोठा दावा केला आहे. त्यामुळे आता ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
2019 साली राणा यांच्याकडून अडसूळ यांचा पराभव
2019 साली आनंदराव अडसूळ यांना नवनीत राणा यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासून अडसूळ आणि राणा हे राजकीय विरोधक आहेत. 2019 सालच्या निवडणुकीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी (अविभाजित) या पक्षांच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. मात्र संसदेत राणा यांनी नेहमी भाजपला पुरक असणारी भूमिका घेतली होती. आता त्यांनी थेट भाजपत प्रवेश केला असून त्या आता महायुतीच्या अमरावतीच्या अधिकृत उमेदवार आहेत. म्हणजेच अडसूळ यांना आता राणा यांचा प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे अडसूळ यांची नाराजी दूर करण्यात महायुतीतील शीर्षस्थ नेत्यांना यश येणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा