Dhananjay Munde : बीडच्या विकासासाठी एका व्यासपीठावर या ; धनंजय मुंडेंचे प्रीतम मुंडेंना आवाहन
Dhananjay Munde : "बीड जिल्ह्याच्या विकासासाठी एका व्यासपीठावर या, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी खासदार प्रितम मुंडे यांना केले आहे.
Dhananjay Munde : "बीड जिल्ह्याच्या विकासासाठी एका व्यासपीठावर बसून जिल्ह्याची घडी बसवणे गरजेचे आहे. यासोबतच जिल्ह्याच्या विकासासाठी एका व्यासपीठावर या, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी खासदार प्रितम मुंडे यांना केले आहे.
आज बीड जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला. या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेवर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव टाकण्यात आले होते. शिवाय व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवरही प्रितम मुंडे यांचे नाव टाकण्यात आले होते. परंतु, या कार्यक्रमाला त्या गैरहजर होत्या. हाच धागा पकडत धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे यांना हे आवाहन केले आहे.
धनंजय मुंडे म्हणाले, "जिल्हा परिषदेच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा झाला. जिल्ह्याला ही इमारत मिळाली, त्यामुळे आज माझी स्वप्नपूर्ती झाली आहे. आठ वर्षे मी या जिल्हापरिषदेच्या सभागृहात काम केले आहे. बीड जिल्ह्याला मागासलेला जिल्हा म्हटले जाते. परंतु, हा मागासलेपणा पुसून बीड जिल्ह्याचा विकास केला पाहिजे. मी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. आजच्या कार्यक्रमासाठीच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रोटोकॉलप्रमाने अधिकाऱ्यांनी नावे टाकली आहेत. परंतु, काही जण कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहित. जिल्ह्याच्या विकासासाठी एका व्यसपीठावर या"
"बीड जिल्ह्यात लवकरच रेल्वे येईल, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसाठीही प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली.
धनंजय मुंडे म्हणाले, ' बीड जिल्ह्याला मागासलेला जिल्हा म्हटले जाते. त्यामुळे बीड जिल्ह्यात पिक विमा घ्यायला कोणती कंपनी येत नव्हती. परंतु, मी जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर पहिल्या बैठकीत विमा कंपनीवर एफआयआर दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे दुसऱ्या वर्षीही एकही कंपनी पिक विमा घ्यायला आली नाही. त्यामुळे आपण बीड जिल्ह्याचा स्वतंत्र पॅटर्न तयार केला. आज राज्यात बीड जिल्ह्याच्या विमा पॅटर्नचं कौतुक होत आहे. मध्य प्रदेशमधील राज्य सरकारकडून सुद्धा बीड जिल्याचा विमा पॅटर्न लागू करण्याचा विचार सुरू आहे. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझी तळमळ आहे. सर्वांनी एकत्र येत जिल्ह्याचा विकास केला पाहिजे."
महत्वाच्या बातम्या
Beed: धनंजय मुंडे यांचा प्रशासनावर वचक नसल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी वाढून बदनामी होत आहे: भाजप
Dhananjay Munde : पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्याच्या बदनामीचं राजकारण थांबवावं : धनंजय मुंडे
Beed : हात जोडतो..., माझ्यावर वार करा पण बीडला बदनाम करु नका: धनंजय मुंडे