Beed : हात जोडतो..., माझ्यावर वार करा पण बीडला बदनाम करु नका: धनंजय मुंडे
Dhananjay Munde : बीडचा बिहार होतोय अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्याला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
बीड: दोन राजकीय पक्षांमध्ये दोन विचारधारा असू शकतात. विचारधारेची लढाई विचारधारेने होऊ द्या, तुमच्या राजकीय वैऱ्याला बदनाम करायचं आहे तर जिल्ह्याचे नाव घेऊन बदनामी करु नका, हवे तर माझ्यावर वार करा, पण मायभूमीला बदनाम करु नका असे भावनिक आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. बीड शहरातील राष्ट्रवादी भवनात कार्यकर्त्यांच्या जाहीर कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.
नव्यानेच बीड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड झालेले राजेश्वर चव्हाण यांचा आज राष्ट्रवादी भवनात पदभार समारंभ होता आणि या कार्यक्रमानंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले.
बीडचा बिहार होतोय अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. एवढेच नाही तर जिल्ह्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर त्यांनी गृहमंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्यावरच धनंजय मुंडे यांनी कडाडून टीका केलीय.
पंकजा मुंडे यांना आमचं चांगलं चाललेलं बघवत नसल्याने त्या जाणून-बुजून बीड जिल्ह्याला बदनाम करत आहेत असा आरोपही धनंजय मुंडेंनी केला. ते म्हणाले की, बीडच्या माजी पालकमंत्री म्हणजेच पंकजा मुंडे यांना आमचं चांगलं चाललेलं बघवत नसल्याने त्या जाणून-बुजून बीड जिल्ह्याला बदनाम करत आहेत. पंकजा मुंडे आता सत्तेत नाहीत, त्यामुळे त्यांना बीड बिहारमध्ये गेल्यासारखं वाटतंय. म्हणून त्यांनी कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केलाय. मात्र मी या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारलं असून इमानेइतबारे माझं काम करत आहे. त्यामुळे मी हात जोडतो, काय टीका करायची ती माझ्यावर करा. मात्र माझ्या मायभूमीला बदनाम करू नका.
जे कन्व्हिन्स होत नाहीत त्यांना कन्फ्यूज करणं हीच भाजपची नीती
धनंजय मुंडे यांनी भाजपवर देखील सडकून टीका केली आहे. ते म्हणाले की, "निवडणुका जिंकता आल्या नाही की भाजपचे लोक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. ही भाजपची पूर्वीपासून ची नीती आहे. आधी ते तुम्हाला कव्हिन्स करायचा प्रयत्न करतील आणि कन्व्हिन्स होत नाही म्हटल्यावर तुम्हाला कन्फ्यूज करतील. त्यामुळे जनतेने भाजपच्या या संभ्रमाला बळी न पडता राष्ट्रवादीला साथ द्यावी. "
नगरपंचायत निवडणुकीमध्ये यश अपयश मिळालं. मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकीत बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार असल्याच. देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
संबंधित बातम्या: