एक्स्प्लोर
छेड काढणाऱ्या तरुणाला विद्यार्थिनींनी रस्त्यातच चोपलं!
निफाड: गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या योगेश पगार नावाच्या व्यक्तिला मुलींनी जन्माची अद्दल घडवली आहे. योगेशला गाठून मुलींनी त्याला भररस्त्यात चांगलाच चोप दिला.
निफाड तालुक्यातील रानवड साखर कारखाना परिसरातील माध्यमिक आणि ऊच्च माध्यमिक कॉलेजला जाणाऱ्या नांदूर्डीच्या मुलींना मागील अनेक महिन्यांपासून आरोपी योगेश हा त्यांची छेड काढायचा. अखेर काही जणांच्या साथीनं आज योगेशला रस्त्यातच पकडण्यात आलं. त्यानंतर मुलींनी आपला संताप व्यक्त करत त्याला यथेच्छ चोप दिला.
दरम्यान, याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिसानी सदर आरोपीला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement