CMOच्या ट्विटरवर पुन्हा औरंगाबादचा नामोल्लेख 'संभाजीनगर', काँग्रेसच्या विरोधानंतरही ट्वीट
मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसनं विरोध दर्शवला होता. आज पुन्हा सीएमओच्या ट्विटर हॅन्डलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा नामोल्लेख संभाजीनगर असा केला आहे.
![CMOच्या ट्विटरवर पुन्हा औरंगाबादचा नामोल्लेख 'संभाजीनगर', काँग्रेसच्या विरोधानंतरही ट्वीट CMO Maharashtra official twitter Again mentions Aurangabad as Sambhajinagar in Tweet CMOच्या ट्विटरवर पुन्हा औरंगाबादचा नामोल्लेख 'संभाजीनगर', काँग्रेसच्या विरोधानंतरही ट्वीट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/08012047/uddhav-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु झाल्या आहेत. यातच काल थेट सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसनं विरोध दर्शवला होता. मात्र यानंतरही आज पुन्हा सीएमओच्या ट्विटर हॅन्डलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचा नामोल्लेख संभाजीनगर असा केला आहे.
आज CMO च्या ट्विटरवरुन म्हटलं आहे की, काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 31 डिसेंबर 2020 पर्यंत राज्यातील नियमित न झालेल्या गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरवासीयांना याविषयी आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली आहे. त्यामुळे संभाजीनगर सारख्या मराठवाड्याच्या राजधानी शहरातील सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न साकार होणार असून उत्तम रितीने नागरीकरण होऊ शकेल. यापुढे देखील असे जनहिताचे निर्णय घेण्यात येतील त्याकरिता आपले सहकार्य आणि प्रेम असेच राहू द्या, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत राज्यातील नियमित न झालेल्या गुंठेवारी नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे. मी काही दिवसांपूर्वी संभाजीनगरवासीयांना याविषयी आश्वासन दिले होते, त्याची पूर्तता केली आहे...(१/२) pic.twitter.com/aS5rZJGfnZ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 7, 2021
शहराचं नाव बदलून वातावरण खराब करण्याची गरज नाही : बाळासाहेब थोरात
नाव बदलणं किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही - बाळासाहेब थोरात
काल काँग्रेसने अधिकृत हँडलवरून केलेल्या ट्विटला विरोध केला होता. तरीही आज पुन्हा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या विषयी बोलताना म्हणाले होते की, "उत्तम काम कसं होऊ शकतं याचा आदर्श महाविकास आघाडीने घालून दिलेला आहे. पण असं असलं तरीदेखील कोणत्याही एका शहराचं, गावाचं नाव बदलून वातावरण प्रदूषिक करण्याचं काही कारण नाही, हे आमचं स्पष्ट मत आहे. तो किमान समान कार्यक्रमाचा भागही नाही, त्यामुळे अशा प्रकारांना आमचा पहिल्यापासून विरोध आहे. छत्रपती संभाजी महाराज आमचेही आदर्श आहेत. सर्वांचेच श्रद्धास्थान आहेत. परंतु, याप्रकरणात सामाजिक तेढ वाढू नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. खरंतर जिथे सरकारी डिपार्टमेंट काम करतं तिथे अशाप्रकारची चूक होता कामा नये, म्हणून मी त्यासंदर्भातील ट्वीट केलेलं आहे."
काल सीएमओ म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाच्या ऑफिशियल ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या एका ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. ट्विटमध्ये औरंगाबादमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयासंदर्भातील एका निर्णयासंदर्भात माहिती देताना संभाजीनगर असा उल्लेख केला होता. त्यात औरंगाबाद हे नाव कंसात देण्यात आलं आहे.
औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु
संबंधित बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)