एक्स्प्लोर
Advertisement
आमचं उष्ट कोणी खाऊ नये.. औरंगाबादच्या नामकरणावरुन गुलाबराव पाटलांचा मनसेला खोचक टोला
औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या स्वागताच्या बॅनरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आलाय. यावरुन शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मनसेला खोचक टोला लगावला आहे.
जळगाव : हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे आता औरंगाबादचं नाव संभाजीनगर करू पाहत असलं तरी हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा लावून धरला होता. तेव्हापासून प्रत्येक शिवसैनिक औरंबगाबादचा उल्लेख हा संभाजीनगर म्हणूनच करीत आहे. त्यामुळे आमचं उष्ट कोणी खाऊ नये, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी औरंगाबाद येथे लावलेल्या बॅनरवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आलाय. यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे औरंगाबाद शहरामध्ये येणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागताचे बॅनर शहरात लावण्यात आलंय. या बॅनरवर मनसेकडून पहिल्यांदाच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आलाय. यावर शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी टीका केलीय. औरंगाबादच्या नामकरणाचा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा लावून धरल्याची आठवण त्यांनी करुन देत आमचं उष्ट कोणी खाऊ नये, असा खोचक टोलाही मनसेला लगावला.
बंगल्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंत्री देत नाहीत
मंत्र्यांच्या बंगल्यावर दुरुस्तीसाठी मोठा खर्च केला जात आहे. या विषयावर विरोधक सरकारला घेरत असल्याचे पाहायला मिळत आहे. या विषयावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे, की दुरुस्तीचे प्रस्ताव हे काही मंत्री बनवत नाही, ते वेगवेगळ्या एजन्सीज ठरवतात. त्या एजन्सीच्या पाहणीनुसार दुरुस्तीची गरज असेल तर ती दुरुस्ती केली जाते. मंत्र्यांच्या बंगल्यावर येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्यांच्या सोयीचा दृष्टीने गरज असेल तर ते दुरुस्त केलं जातं ते कोणी मंत्र्यांनी ठरवलेलं नाही.
मनसेकडून औरंगाबादचा उल्लेख 'संभाजीनगर'; महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी?
आमचं सरकार पाच वर्ष चालणार
भाजप काहीही म्हणत असलं तरी आमचं सरकार पाच वर्षे जोरदार चालेल. त्यांना त्यांचे आमदार सांभाळून ठेवण्यासाठी आणि त्यांचं मनोबल उंचावून ठेवण्यासाठी आम्ही पुन्हा सत्तेत येत असल्याचे सांगत राहावे लागत आहे. मात्र, आम्ही पाच वर्षे पूर्ण करणार असल्यचा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या सरकारी निर्णयाची पाठराखण करताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे, की या निर्णयामुळे एक दिवसाचा शासनाचा खर्च वाचला, विजेचा खर्च वाचला, ट्राफिक जाम वाचलं त्यामुळे यांनी उगाच बोंबाबोंब करू नये.
शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योग करावा -
शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही अशी सामाजिक परिस्तिती सध्या समाज्यात पाहायला मिळत आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे, की तरुणांनी शासनाची मदत घेऊन उद्योग व्यवसाय करावा, मुलींनी ही नोकरीवाल्याची अपेक्षा न ठेवता चांगला उद्योग करणाऱ्याशी विवाह करायला हवा. बँकेमध्ये अनेक ठिकाणी परराज्यातील अधिकारी असल्याने त्यांच्याशी संवाद साधताना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. हे पाहता ज्या राज्यातील अधिकारी असेल त्याला त्याच राज्यात नेमणूक दिली तर त्यांच्या दृष्टीने ही फायदेशीर ठरेल आणि जनतेच्याही दृष्टीने फायदेशीर राहणार असल्याने आपण केंद्र सरकारकडे ही मागणी करीत असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
MNS | राज ठाकरेंचा औरंगाबाद दौरा, बॅनरवर हिंदुत्व जननायक असाही उल्लेख | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बातम्या
क्रिकेट
भविष्य
Advertisement