संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत 'राममंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला होईल अशी तारीख जाहीर झाली आहे. आपण त्या भूमिपूजनाला जाणार का?' असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला असता त्यांनी हे उत्तर दिलं. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राममंदिराच्या मुद्द्याला लढ्याची पार्श्वभूमी आहे. ज्याच्यावर बाबराने आक्रमण करुन मशीद बांधली होती. त्याठिकाणी आपण पुन्हा मंदिर उभं करतोय. केवळ भारतातील हिंदूंचं नाही तर जागतिक कुतुहलाचा हा विषय आहे. आज आपल्याकडे कोरोनाचं संकट आहे. त्यामुळं सर्व मंदिरांमध्ये जाण्या-येण्याला बंदी आहे. मी अयोध्येला जाऊन येईन पण लाखो रामभक्त जे उपस्थित राहू इच्छितात, त्यांचं तुम्ही काय करणार? त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार. त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का? कारण हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथं जाण्याची इच्छा असणार. तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करु शकता, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सूचवले.
तुकाराम मुंढेंबाबत मुख्यमंत्री ठाकरेंचं महत्वाचं वक्तव्य, म्हणाले...
राममंदिराच्या लढ्यात शिवसेनेच्या भूमिकेची इतिहासाने दखल घेतली
उद्धव ठाकरे म्हणाले की, राममंदिराच्या लढ्यात शिवसेनेच्या भूमिकेची इतिहासाने दखल घेतली आहे. मी मुख्यमंत्री नव्हतो त्याही वेळेला राममंदिरात गेलो. किंबहुना योगायोगावर माझी श्रद्धा आहे. माझी भावना हेच सांगते की, नोव्हेंबर 18 मध्ये पहिल्यांदा मी राममंदिरात गेलो होतो, आपण सोबत होतात. शिवनेरीवरची म्हणजे शिवजन्मभूमीची एक मूठ माती मी घेऊन गेलो, त्यानंतर या विषयाला खूप चालना मिळाली. त्याआधी हा विषय थंड पडला होता. कोणी काही विषयच काढत नव्हता. शिवसेनेने सुरुवात केली. उशीर लागत असेल तर कायदा बनवा, वटहुकूम काढा, वाट्टेल ते करा, पण राममंदिर बनवा,' असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा- राम मंदिर भूमीपूजनाला विरोध, अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल
... पण ही माझी श्रद्धा
उद्धव ठाकरे म्हणाले की, ही शिवसेनेची मागणी होती. त्यासाठी आपण अयोध्येला गेलो. तुम्ही योगायोग म्हणा, काही म्हणा, ज्या 18 च्या नोव्हेंबरमध्ये मी तिथे गेलो, त्याच्या पुढच्या नोव्हेंबरमध्ये राममंदिराचा प्रश्न सुटला आणि मी मुख्यमंत्री झालो. ही माझी श्रद्धा आहे. ज्याला कोणाला अंधश्रद्धा म्हणायचं असेल त्याने म्हणावे, पण ही माझी श्रद्धा आहे आणि असणारच. मुद्दा काय येतो की, सध्या सर्वत्र कोरोनाचं थैमान आहे. मी ठीक आहे. मी म्हणेन, मी अयोध्येला जाणारच. मी मुख्यमंत्री आहे, पण मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही मला तिथे मानपान… सगळं मिळतं. मिळालं. तेही शिवसेनाप्रमुख आणि त्यांचा मुलगा म्हणून. ती पुण्याई माझ्याकडे आहेच. आता तर मुख्यमंत्री आहे. मला बंदोबस्त मिळेल, मी व्यवस्थित जाईन. मी पूजाअर्चा करून किंवा त्या कार्यक्रमात सहभागी होऊन परत येईन, पण हे मंदिर सर्वसामान्य मंदिर नाहीय. एखाद्या गावात मंदिर बनवायचं झालं तरी गावकरी एकदिलाने एकत्र येतात, त्या गावासाठी ते अयोध्येसारखेच राममंदिर असते. ते अनेक लोक अयोध्येला जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी गावातलं ते मंदिर महत्त्वाचं असतं, असं ते म्हणाले. लाखो रामभक्त जे उपस्थित राहू इच्छित असतील, त्यांचं तुम्ही काय करणार? त्यांना तुम्ही अडवणार की त्यांना येऊ देणार? त्यांच्या कळत नकळत कोरोनाचा प्रसार होऊ देणार का? कारण हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथे जाण्याची इच्छा असणार. नाहीतर तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करू शकता, असं ते म्हणाले.
हेही वाचा- सरकार तीन चाकी असलं तरी स्टिअरिंग माझ्याच हाती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मी जाणार, पण अजून तारीख निश्चित नाही
ते म्हणाले की, राममंदिर हा भावनेचा प्रश्न आहे. लोक भावनेनं त्या विषयाला जोडले गेले आहेत. त्यांना तुम्ही थांबवणार कसे. माझं येणं-जाणं मी करीन. मी मुख्यमंत्री असल्याने मी जाऊन येईन. अजूनही अधिकृत तारीख आलेली नाही. अधिकृत कार्यक्रम कसा असेल त्याची कल्पना नाहीय. तो कार्यक्रम आल्यानंतर आपण ते ठरवू, पण लाखो लोकांची जी भावना आहे की तिकडे उपस्थित राहावं. त्यांना तुम्ही कसं अडवणार? कारण तिकडे तो शरयूचा काठच महत्त्वाचा आहे. कारण राममंदिराचं आंदोलन चाललं होतं तेव्हा शरयूसुद्धा लाल झाली होती, रामभक्तांच्या रक्ताने. अशा लाखो, करोडो लोकांच्या भावना निगडित आहेत, असं ठाकरे म्हणाले.
माझे आजोबा नास्तिक नव्हते
उद्धव ठाकरे म्हणाले, मी दोन ते तीन वेळा अयोध्येत गेलोय. माझा अनुभव सांगतो. मुळात मी अंधश्रद्धाळू नाही हे लक्षात घ्या. माझे आजोबा, माझे वडील यांची स्पष्ट मते होती. आजोबांची मतं मला चांगली माहीत आहेत. माझे आजोबा नास्तिक नव्हते. त्यांची देवावर आणि देवीवर श्रद्धा होतीच. माझे वडील अंधश्रद्धाळू नव्हते. श्रद्धा आणि अंधश्रद्धेत एक पुसटशी लाइन आहे. ती फार महत्त्वाची आहे. त्या भावनेनेच मी सांगतो, आतापर्यंत मी तीन वेळा अयोध्येला गेलो, पण तिथल्या गाभाऱ्यासमोर उभं राहिल्यानंतर मला जो अनुभव आला तो अद्भुत होता. इतरांना तसा अनुभव आला असेलही, मी नाही म्हणत नाही. त्यामुळे या विषयावर माझ्याशी कोणी वाद घालू नये किंवा शिकवू नये, असं ते म्हणाले.
कालच्या भागात काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे
'मी लॉकडाऊन उघडतो, लोकं मृत्यूमुखी पडली तर जबाबदारी घ्याल का?' : मुख्यमंत्री ठाकरे
... म्हणून मी मंत्रालयात जात नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
'एकच शरद सगळे गारद' ही शरद पवारांची मुलाखत गाजल्यानंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत काल 25 आणि आज 26 जुलैला प्रसारित झाली.
पाहा संपूर्ण मुलाखत
शरद पवार यांच्या मुलाखतीतील महत्वाच्या बातम्या
भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती, फडणवीसांच्या गौप्यस्फोटांमध्ये तथ्य नाही : शरद पवार
पाकिस्तान नाही तर चीन आपला सर्वात मोठा शत्रू : शरद पवार
लॉकडाऊनबाबत कठोर भूमिका घेतली नसती तर न्यूयॉर्कसारखी अवस्था झाली असती : शरद पवार
Sharad Pawar | सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभव करतात; शरद पवार यांचा फडणवीस यांना टोला
शिवसेना नसती तर भाजपचा आकडा 105 नाही 40-50 असता : शरद पवार
'सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?', संजय राऊतांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले...