यावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मंत्रालय आता बंद आहे. आज तंत्रज्ञान एवढं प्रगत झालं आहे. तुम्ही त्याचा योग्य वापर करु शकत नसाल तर तुमच्यासारखे दुर्भाग्य असणारे तुम्हीच आहात. आता मुलाखत झाल्यानंतर घरी जाऊन मी महापालिकेचे आयुक्त, उपायुक्त यांच्याबरोबर बैठक घेणार आहे. हे रोजचं चाललं आहे. विदर्भातील सर्व जिल्हाप्रमुखांची बैठक मी काल व्हिडीओ कॉन्फरन्सवरुन घेतली. परवा महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या आमदारांची एक व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. म्हणजे एका वेळेस घरात बसून मी सगळीकडे जाऊ शकतो. मी पूर्ण राज्य कव्हर करतोय आणि निर्णय घेतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तंत्रज्ञान उपलब्ध आहे तर ते वापरायला हवे
ते म्हणाले की, फिरणं आवश्यक आहे हे मी मान्य करतो, त्याला मी नाही म्हणत नाही. मात्र जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्ही एकाच ठिकाणी जाता. पण ज्यावेळेला तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करता तेव्हा तुम्ही सर्व ठिकाणी जाता. प्रवासाचा वेळ वाचतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तंत्रज्ञान उपलब्ध आहे तर ते वापरायला हवे असं मत व्यक्त करताना त्यांनी, “उद्या मी म्हणेन की तुम्ही विमानाने का जाता बैलगाडीतून जा. तुम्हाला तंत्रज्ञानाचा वापर करायचाच नाहीय तर मग शोध लावता कशाला?, असा सवाल ठाकरे यांनी टीकाकारांना केला.
काय म्हणतंय ठाकरे सरकार? शरद पवारांनंतर संजय राऊतांकडून मुख्यमंत्र्यांची मुलाखत
नियमांचं पालन मी नाही केलं तर जनता का करेल?
संजय राऊत यांनी तंत्रज्ञानामधून तुम्ही अधिकाऱ्यांशी संवाद साधू शकता मात्र जनतेशी संवाद कमी होतोय असं नाही वाटतं का? असा प्रश्न विचारला असता त्यावर ठाकरे म्हणाले की, सध्या आपली परिस्थिती लॉकडाऊनची आहे. सभा, समारंभांना बंदी आहे. जनतेला त्यासाठी बोलवणं म्हणजे आपला नियम आपणच मोडण्यासारखं आहे. म्हणजे मी मुख्यमंत्री आहे तर माझ्या आजूबाजूला कोणी येणार नाही. पण माझ्यासमोर माझी जनता बसेल त्यांचं काय? ते असे दाटीवाटीने बसले मी संवाद साधला. मात्र त्यामुळे ते आजारी पडले तर त्या संवादाचा उपयोग काय होणार? नियमांचं पालन मी नाही केलं तर जनता का करेल?, असं मुख्यमंत्री म्हणाले. हे असं वागणं म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असं होईल,असंही ठाकरे म्हणाले.
'माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा', मुख्यमंत्री ठाकरेंचं आव्हान
शरद पवारांची मुलाखत गाजल्यानंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत आज 25 आणि उद्या 26 जुलैला प्रसारित होत आहे.
पाहा संपूर्ण मुलाखत
शरद पवार यांच्या मुलाखतीतील महत्वाच्या बातम्या
भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती, फडणवीसांच्या गौप्यस्फोटांमध्ये तथ्य नाही : शरद पवार
पाकिस्तान नाही तर चीन आपला सर्वात मोठा शत्रू : शरद पवार
लॉकडाऊनबाबत कठोर भूमिका घेतली नसती तर न्यूयॉर्कसारखी अवस्था झाली असती : शरद पवार
Sharad Pawar | सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभव करतात; शरद पवार यांचा फडणवीस यांना टोला
शिवसेना नसती तर भाजपचा आकडा 105 नाही 40-50 असता : शरद पवार
'सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?', संजय राऊतांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले...