मुलाखतीमध्ये संजय राऊत यांनी तुकाराम मुंढे नागपूरमध्ये लावत असलेल्या शिस्तीबाबत प्रश्न विचारला. तेव्हा शिस्तप्रिय तुकाराम मुंढेंच्या पाठिशी मी आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, नागपूर महापालिका विरुद्ध तुकाराम मुंढे यांचा वाद सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. एखादा अधिकारी कठोर आणि कडक शिस्त पालन करणारा असू शकतो. तुकाराम मुंढे यांनी लोकहिताचे निर्णय घेतले. नागपूरमध्ये त्यांनी एक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घेतलेले निर्णय जर काही लोकांना पटत नसतील त्यांनी हे लक्षात घ्यावं की तिथे आता निवडणुकीचा जमाना नाही. मतदार वाचले तर मतदान होईल हे लक्षात घ्यावं. अशा सगळ्या वातावरणात तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्याने जर एखादी गोष्ट अमलात आणली तर अशा अधिकाऱ्याच्या पाठिशी उभं राहिलंच पाहिजे. आततायीपणा कुणीही करु नये. पण एक चांगली शिस्त जर लावली जात असेल आणि जनतेचं हित त्यामध्ये साधलं जात असेल तर मी तुकाराम मुंढेंच्या पाठिशी आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी तुकाराम मुंढे यांची पाठराखण केली आहे.
हेही वाचा- सरकार तीन चाकी असलं तरी स्टिअरिंग माझ्याच हाती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या निर्णयांबाबत नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे नगरसेवकांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. तुकाराम मुंढे फोन उचलत नाहीत, भेटायला गेल्यास बाहेर उभं ठेवतात अशा देखील तक्रारी त्यांच्या संदर्भात झाल्या होत्या. महत्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तुकाराम मुंढे यांची तक्रार थेट पंतप्रधान कार्यालयात पत्र पाठवून केली होती.
कालच्या भागात काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे
'मी लॉकडाऊन उघडतो, लोकं मृत्यूमुखी पडली तर जबाबदारी घ्याल का?' : मुख्यमंत्री ठाकरे
... म्हणून मी मंत्रालयात जात नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
'एकच शरद सगळे गारद' ही शरद पवारांची मुलाखत गाजल्यानंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत काल 25 आणि आज 26 जुलैला प्रसारित झाली.
पाहा संपूर्ण मुलाखत
शरद पवार यांच्या मुलाखतीतील महत्वाच्या बातम्या
भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती, फडणवीसांच्या गौप्यस्फोटांमध्ये तथ्य नाही : शरद पवार
पाकिस्तान नाही तर चीन आपला सर्वात मोठा शत्रू : शरद पवार
लॉकडाऊनबाबत कठोर भूमिका घेतली नसती तर न्यूयॉर्कसारखी अवस्था झाली असती : शरद पवार
Sharad Pawar | सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभव करतात; शरद पवार यांचा फडणवीस यांना टोला
शिवसेना नसती तर भाजपचा आकडा 105 नाही 40-50 असता : शरद पवार
'सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?', संजय राऊतांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले...