एक्स्प्लोर
Thane Polls: 'दोन भाऊ एकत्र लढतील तेव्हा ताकद दिसेल', Sanjay Raut यांची ठाण्यात मोठी घोषणा
ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना (UBT) आणि मनसे (MNS) एकत्र लढणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. 'दोन भाऊ एकत्र लढतील तेव्हा ताकद दिसेल', असे म्हणत राऊत यांनी ठाकरे बंधूंच्या युतीचे स्पष्ट संकेत दिले. भाजपच्या (BJP) 'अबकी बार सत्तर' या घोषणेला उत्तर देताना, 'आमचाही नारा पंच्याहत्तर पार आहे... अहो दोन ठाकरे आहेत ना,' असे म्हणत संजय राऊत यांनी प्रतिआव्हान दिले. ठाण्यामध्ये आम्ही आणि मनसे एकत्र लढणार असून सत्तेवर येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'ठाण्यामध्ये ठाकरे ठिकऱ्या उडवतील,' असा थेट इशाराही राऊत यांनी दिला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
पुणे
Advertisement
Advertisement

















