एक्स्प्लोर

Solapur crime Pooja Gaikwad: उपसरपंचांना नादाला लावून आयुष्यातून उठवणाऱ्या पूजा गायकवाडला कोर्टाचा झटका, जामीन अर्ज फेटाळला

Solapur crime Pooja Gaikwad: बीडच्या उपसरपंचांना आयुष्यातून उठवणाऱ्या पूजा गायकवाडला झटका, न्यायालयाने जामीन फेटाळला. गोविंद बर्गे यांनी स्वत:चे आयुष्य संपवले होते.

Solapur crime Pooja Gaikwad: प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने बीड येथील लुखामसला गावचे उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (Govind Barge Suicide) यांनी आत्महत्या केली होती. याप्रकरणातील आरोपी नर्तकी पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) हिचा जामिनाचा अर्ज जिल्हासत्र न्यायाधीश व्ही.एस.मलकलपत्ते-रेड्डी यांनी फेटाळून लावला. पूजा गायकवाड हिच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. न्यायालयाने जामीन फेटाळल्याने आता नजीकच्या काळात तुरुंगाबाहेर येण्याच्या पूजा गायकवाड हिच्या अपेक्षांना या निर्णयामुळे सुरुंग लागला आहे.

पूजा गायकवाड हिने बंगला आणि पाच एकर जमीन नावावर कर म्हणून मानसिक त्रास दिल्याने गोविंद बर्गे यांनी सप्टेंबर महिन्यात स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. पूजा गायकवाड हिला जामीन मिळाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. याशिवाय अशा महिलांकडून इतर पुरुषांचा आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील डॉ. प्रदीपसिंग राजपूत यांनी केला. हा युक्तिवाद मान्य करत  न्यायालयाने आरोपी पूजा गायकवाड हिचा जामीन अर्ज फेटाळला. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे डॉ. राजपूत तर आरोपीतर्फे अॅड. आर. डी. तारके यांनी काम पाहिले.

Dharashiv News: धाराशिवमधील लोकनाट्य कला केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर धाराशिव जिल्ह्यातील लोकनाट्य कला केंद्रांवर प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कालिका आणि गौरी लोकनाट्य कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील चार लोकनाट्य कला केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून तुळजाई, पिंजरा, साई, आणि कालिका या केंद्रांचे परवाने रद्द झाले आहेत. सोलापूर-धुळे महामार्गालगत असलेल्या या केंद्रांनी प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी वाढती गुन्हेगारी आणि नियमभंगाविरोधात स्पष्ट संदेश दिला आहे. 

Beed News: नेमकं प्रकरण काय?

गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता. ते अनेक कला केंद्रात जायचे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही काही जमीन केली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले गेले होते. प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले होते.

गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते. मात्र, ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुरे येथील घरी आले होते. याठिकाणी दोघांमध्ये नेमके काय झाले, हे माहिती नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला. कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता. त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात कानशिलात गोळी झाडून घेतल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. गोविंद बर्गे यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरुन डाव्या बाजूने बाहेर पडली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

आणखी वाचा

नर्तिका पूजाच्या प्रेमात ठार वेडा; कलाकेंद्रा व्यतिरिक्त, घरी तर कधी बीड कधी वैरागच्या लॉजवर भेटायचे, गोविंद बर्गे प्रकरणात नवा खुलासा समोर

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट; तातडीच्या सुनावणीची मागणी उच्च न्यायालयाने नाकारली, कोर्टात नेमकं काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात महत्त्वाची अपडेट; तातडीच्या सुनावणीची मागणी उच्च न्यायालयाने नाकारली, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget