एक्स्प्लोर

Solar Power Plant: शेतकर्‍यांना दिलासा! राज्यातील पहिला मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प सुरू, अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा होणार

Solar Power Plant : शेतकर्‍यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. 3 मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित करण्यात आलाय.

Chhatrapati Sambhajinagar : शेतकर्‍यांना (Farmers) दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत, राज्यात 9 हजार 200 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यापैकी 3 मेगावॅट क्षमतेचा पहिला सौरऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे 1 हजार 753 शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून या महत्वाकांशी प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  

उपमुख्यमंत्री तथा राज्याचे ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे. हा जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे. धोंदलगाव प्रकल्पाची ही सुरुवात आहे. या वर्षी मार्चमध्ये प्रदान केलेल्या 9 हजार 200 मेगावॅट विकेंद्रित सौर प्रकल्पांचा हा एक भाग आहे. प्रकल्पांतर्गत संपूर्ण क्षमता डिसेंबर 2025 पर्यंत टप्प्याटप्प्याने कार्यान्वित केली जाणार आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळणार

धोंदलगाव येथे महावितरणच्या उपकेंद्रापासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या 13 एकर शासकीय जमिनीवर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या कामासाठी महावितरणकडून संबंधित कंपनीला 7 मार्च 2024 रोजी कार्यादेश देण्यात आला. तसेच 17 मे रोजी वीजखरेदी करार करण्‍यात आला. त्यानंतर अवघ्या साडेचार महिन्यांत प्रकल्प उभारून 5 सप्टेंबर रोजी कार्यान्वित करण्यात आला आहे. हा प्रकल्प महाविरणच्या धोंदलगाव 33 केव्ही उपकेंद्राशी जोडण्यात आला आहे. त्यामुळे उपकेंद्रातून निघणाऱ्या 5  वीजवाहिन्यांवरील 1 हजार 753 शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा मिळणार आहे. धोंदलगाव, नालेगाव, अमानतपूरवाडी व संजरपूरवाडी या गावांतील शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून 2022 रोजी सत्तेची सूत्रे स्वीकारल्यानंतर किमान तीस टक्के कृषी फीडर्स डिसेंबर 2025 पर्यंत सौर ऊर्जेवर चालविण्यासाठी मिशन २०२५ जाहीर केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढविण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने नुकतीच मान्यता दिली आहे. मिशन मोडवरील या योजनेतून सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट 7 हजार मेगावॅटने वाढवून 16 हजार मेगावॉट विकेंद्रीत सौर ऊर्जा क्षमता निर्मिती उद्दिष्टास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील शंभर टक्के कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा होणार आहे.

नेमकी योजना काय?

सौर ऊर्जेचा वापर करून वीज निर्माण करायची आणि त्याच्या आधारे कृषी पंप चालवायचे, अशी ही योजना आहे. त्यासाठी राज्यात विविध ठिकाणी विकेंद्रित स्वरुपात सौर ऊर्जा निर्मिती केंद्रे उभारण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा भरवशाचा वीज पुरवठा होण्यासोबत स्वस्तात वीज उपलब्ध झाल्याने उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करण्याची संधी भविष्यात मिळणार आहे. या योजनेमुळे कृषी क्षेत्राला मोलाची मदत करण्यासोबतच उद्योगांनाही प्रोत्साहन मिळणार आहे.

हे ही वाचा 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
राष्ट्रप्रथम नाही, आता भ्रष्ट प्रथम, भाजपकडून सोलापुरात 300 कोटी आले; उत्तम जानकरांचा सणसणाटी दावा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 नोव्हेंबर 2025 | शनिवार
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
आमदार सुरेश धस यांच्यापासून माझ्या जीवाला धोका; ॲड. असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
पोलीस बसले बाजुला, अल्पवयीन मुलगा ठेवला उपमुख्यमंत्र्‍यांच्या सुरक्षेला; महिलांची करतोय चेकींग
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
Embed widget