'राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, विधानसभा अध्यक्षांचे सीसीटीव्ही फुटेज गायब कसं होतं? भूषण गगराणी पालिकेचे आयुक्त, ते सुद्धा या कट कारस्थानात सामील झाले आहेत का?'
या राज्याच्या निवडणूक आयुक्तांचे नाव दिनेश वाघमारे आहे. त्यांनी नावाला जागत या वाघमारेंनी निदान लांडग्याना तरी माराव, हे त्यांना सामील आहेत की काय? अशा शब्दात खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली.

Sanjay Raut: बिनविरोध निवडून येण्यासाठी जी स्पर्धा सुरू झाली आहे त्यामध्ये फक्त धमक्या पैशाचा वापर, ब्लॅकमेलिंग, दहशत सुरु आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी महानगरपालिकेला बिनविरोध लोकं निवडून आलेच नव्हते. कल्याण डोंबिवलीमध्ये ही स्पर्धा भाजप आणि मिंधे गटात लागली आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणेचा गैरवापर होत आहे. या राज्याच्या निवडणूक आयुक्तांचे नाव दिनेश वाघमारे आहे. त्यांनी नावाला जागत या वाघमारेंनी निदान लांडग्याना तरी माराव, हे त्यांना सामील आहेत की काय? अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तोफ डागली.
महाराष्ट्रातील सगळे गुंड अजित पवारांच्या पक्षात
संजय राऊत म्हणाले की, हे निवडणूक अधिकारी धमक्या देत आहेत. संबंधित पालकमंत्र्यांचा दबाव आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं वातावरण कधीच निर्माण झालं नव्हतं ते आता भाजप, मिंधे आणि अजित पवारांनी सुरु केलं. त्यांनी सांगितले की, जे निवडणूक अधिकारी आहेत. जे आरओ आहेत त्यांच्यावर अनेक मंत्र्यांकडून दबाव येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून अनेक मंत्र्यांचे फोन त्यांना जात आहेत. आचारसंहिता लागू आहे पण उपमुख्यमंत्री जे ठाण्यातील आहेत त्यांच्या निवासथानाबाहेर सरकारी अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा उभा होता. त्याच्यामध्ये काही आरओ होते. ठाण्यात मोठ्या प्रमाणात अर्ज बाद करण्यात आले. हे सर्व विरोधी महाविकास आघाडीमधील आहेत. यांचे फोन रेकॉर्ड तपासला पाहिज निवडणूक आयोग, त्यांना कोणत्या मंत्र्यांचे कधी फोन गेले, डेप्युटी सीएमचे कधी फोन गेले आणि त्यानुसार कोणते उमेदवारी अर्ज हे बाद केले.
जनतेला कोणत्या आधारावर ते सांगतात?
अधिकाऱ्यांनी जर आचार संहितेचे पालन स्वतः केलं नाही तर त्यांनी उमेदवारांना आणि जनतेला कोणत्या आधारावर ते सांगतात की आचार संहितेचे पालन करा, अशी विचारणा त्यांनी केली. उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी आरओच्या माध्यमातून दबाव आणले जात आहे. माझ्या माहितीप्रमाणे विधानसभा अध्यक्षांचे सीसीटीव्ही फुटेज गायब कसं होतं? भूषण गगराणी हे पालिकेचे आयुक्त आहेत. ते सुद्धा या कट कारस्थानामध्ये सामील झाले आहेत का? जळगावला उमेदवारांचे किडनॅपपिंग केलं माघार घेत नाही म्हणून आणि जबरदस्तीने माघार घ्यायला लावली, असेही संजय राऊत म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या




















