एक्स्प्लोर

CM Eknath Shinde on Unseasonal Rain : अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा : मुख्यमंत्री

CM Eknath Shinde on Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मी अयोध्येतूनच दिलेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

CM Eknath Shinde on Maharashtra Unseasonal Rain : महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचे संकट (Unseasonal Rain Updates) आलंय. अवकाळी पाऊस पाठ सोडायचं नाव घेत नाहीय अशी स्थिती आहे. गेल्या 48 तासात राज्यात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी गारांचा पाऊस पडलाय. अहमदनगर, अकोला, नाशिक, बीड, यवतमाळ या जिल्ह्यांना पाऊस आणि गारपीटीने झोडपून काढलंय. या गारपिटीमध्ये कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. राज्यातील इतर भागातही पावासाचा फटका शेतऱ्यांना बसलाय. तर दुसरीकडे अवकाळीच्या नुकसानीवरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या आयोध्या वारीला टार्गेट केलं. अयोध्या दौऱ्यावरून मुंबईत परतल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मी अयोध्येतूनच दिले, असल्याचं त्यांनी सांगितलं.

अवकाळीवर मुख्यमंत्री काय म्हणाले?

अयोध्यावरून परतल्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मी मुख्य सचिव आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात असून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही ठिकाणी कलेक्टर स्वतः गेलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे नुकसान झालंय.  सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालं आहे, त्याचे पंचनामे युद्धपातळीवर करा, असे आदेश मी अयोध्येतूनच दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

नुकसानीच्या पाहणीसाठी कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. बीड तालुक्यातल्या कोळवाडी येथे एक किलोमीटरचा डोंगर पार करून अब्दुल सत्तार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. बीड तालुक्यातील कोळवाडी पिंपळनई त्याचबरोबर लिंबागणेश या ठिकाणी जाऊन त्यांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. यावेळी कृषीमत्र्यांनी शेतकऱ्यांशी सवांद साधून त्यांना मदतीचं आश्वासनही दिलं. यावेळी पिंपळनई गावातील काही महिलांनी तात्काळ मदत जाहीर करावी यासाठी सत्तार यांना घेराव घातला. यावेळी सरकार सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगत सत्तारांनी महिलांचे पाय धरत तात्काळ मदत जाहीर करण्याचं आश्वासन दिलं. 

राज्यात कुठे-कुठे अवकाळीचा फटका?

राज्यावरील अवकाळीचं संकट काही केल्या कमी होत नाही आहे. पुन्हा एकदा अवकाळीनं अनेक भागांत अवकृपा केलीय. नाशिक जिल्ह्यातील देवळा, नांदगाव, निफाड, सिन्नर, कळवण, ईगतपुरी, चांदवड, दिंडोरी या तालुक्यात अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान झालंय. या गारपिटीमध्ये कांदा, द्राक्ष, गहू, आंबा, भाजीपाल्यासह अनेक पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झालंय. पुण्यातही मुसळधार पावसासह काही भागात गारपीट झाली. तर तिकडे वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्याला अवकाळी पावसानं अक्षरश: झोडपून काढलं आहे.  अशा परिस्थितीत करायचं काय, जगायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय.

अवकाळी पावसाचा अंदाज 

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कधी उन्हाचा कडका तर कधी अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, मराठवाड्यात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. त्याचबरोबर कोकणासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palghar Leopard Attack: दबा धरून बसलेल्या बिबट्याची 11 वर्षांच्या मयंकवर झडप, दप्तर बनलं 'लाइफसेव्हर'; पालघरमधील घटना
दबा धरून बसलेल्या बिबट्याची 11 वर्षांच्या मयंकवर झडप, दप्तर बनलं 'लाइफसेव्हर'; पालघरमधील घटना
Mumbai Crime Parksite: क्षुल्लक कारणावरुन वाद झाला, तरुणाने लोखंडी रॉड डोक्यात टाकला, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत
मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या, तरुणाने लोखंडी रॉड डोक्यात टाकला अन् पार्कसाईटचे 'महाराज'....
Nagarparishad Election BJP: भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला नगरपरिषद निवडणुकीत पक्षाने डावललं, शहरभर बॅनर्स लावले, म्हणाला, ' माझी उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद'
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला नगरपरिषद निवडणुकीत पक्षाने डावललं, शहरभर बॅनर्स लावले, म्हणाला, 'माझी उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद'
CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Malegaon Morcha : मालेगावचा आक्रोश! आरोपी फाशीच्या मागणीसाठी हजारोंचा मार्चा Special Report
Deshmukh Family : विरोधकाशी बट्टी, मुलाची सोडचिठ्ठी; देशमुख पितापुत्रात गृहकलह Special Report
Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report
Pune News : पुण्यातल्या मन सुन्न करणाऱ्या कहाणीचं पुढचं पान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar Leopard Attack: दबा धरून बसलेल्या बिबट्याची 11 वर्षांच्या मयंकवर झडप, दप्तर बनलं 'लाइफसेव्हर'; पालघरमधील घटना
दबा धरून बसलेल्या बिबट्याची 11 वर्षांच्या मयंकवर झडप, दप्तर बनलं 'लाइफसेव्हर'; पालघरमधील घटना
Mumbai Crime Parksite: क्षुल्लक कारणावरुन वाद झाला, तरुणाने लोखंडी रॉड डोक्यात टाकला, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत
मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या, तरुणाने लोखंडी रॉड डोक्यात टाकला अन् पार्कसाईटचे 'महाराज'....
Nagarparishad Election BJP: भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला नगरपरिषद निवडणुकीत पक्षाने डावललं, शहरभर बॅनर्स लावले, म्हणाला, ' माझी उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद'
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला नगरपरिषद निवडणुकीत पक्षाने डावललं, शहरभर बॅनर्स लावले, म्हणाला, 'माझी उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद'
CIDCO : नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
नवी मुंबईत सिडकोची 4,508 घरे विक्रीस, ‘पहिले येणाऱ्यास पहिले प्राधान्य’ पद्धतीने घर घेण्याची सुवर्णसंधी
Shivsena Vs BJP: 'शिंदेंनी पेरलं ते उगवलंय, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार'; 'सामना'तून खळबळजनक दावा
'शिंदेंनी पेरलं ते उगवलंय, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार'; 'सामना'तून खळबळजनक दावा
Maharashtra Live blog: मंगळवेढा नगरपालिकेमध्ये भाजप आमदार सोमनाथ अवताडेंचे बंधू बिनविरोध नगरसेवक
Maharashtra Live blog: मंगळवेढा नगरपालिकेमध्ये भाजप आमदार सोमनाथ अवताडेंचे बंधू बिनविरोध नगरसेवक
SIP : 5000 रुपयांची दरमहा एसआयपी की 60000 रुपयांची लमसम, कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर, तज्त्र काय म्हणतात जाणून घ्या?
5000 रुपयांची दरमहा एसआयपी की 60000 रुपयांची लमसम, कोणती गुंतवणूक ठरेल फायदेशीर, जाणून घ्या समीकरण
Labour Codes : एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युईटीसाठी पात्र ठरणार, गिग वर्कर्सला पीएफ, ईएसआयसीचा लाभ, नव्या कामगार संहितांनुसार काय बदललं?
Embed widget