एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : दिशा प्रकरणामुळे आधीच विरोधकांचे दिशाहीन झालेले गलबत आणखी भरकटले; मुख्यमंत्री शिंदेंचा टोला

CM Eknath Shinde :  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

CM Eknath Shinde :  दिशा सालियान तपासाच्या (Disha Salian Case) आदेशानंतर विरोधकांचे आधीच दिशाहीन झालेले गलबत आणखीन भरकटले असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांना लगावला. विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, हा प्रस्ताव दाखल करताना विरोधी पक्ष गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहे. चहापानावर बहिष्कार टाकला तेव्हा विरोधकांचे पत्र आले अवसान गळाले असल्याचे दिसून आले. वरिष्ठ नेते इंडी आघाडीचे जागा वाटपात व्यग्र असल्यामुळे, दिशा प्रकरणामुळे आधीच दिशाहीन झालेले गलबत आणखीन भरकटलेले दिसले असल्याचे टोला मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे यांनी लगावला. 

आम्ही राज्य हाती घेतले आणि एफडीआय मध्ये पुन्हा पहिल्या क्रमांकावर आले. मेट्रो, कारशेड, समृद्धी, बुलेट ट्रेन, सी लिंक, मिसिंग लिंक, कोस्टल रोड या पायाभूत सुविधांचा यू टर्न बंद केला
त्या। फास्ट ट्रॅकवर आणल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. आरोपाला आरोप म्हणून विरोध करता कामा नये. चांगल्याला चांगले म्हणायचे. नाईलाजाने का होईना आपल्या। कामांची स्तुती विरोधक करत आहेत. म्हणून जलशिवार योजनेची मागणी विरोधक करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर टीका केली. अशोक चव्हाण आता सभागृहात नाहीत.  काल त्यांनी आरोप केला की मराठ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नात राजकारण केले. मी अध्यक्ष होऊ नये म्हणून पडद्याआड प्रयत्न केले. मी अध्यक्ष झालो तर तातडीने मराठा आरक्षण मिळावे म्हणून काम करेल. ही भीती अडीच वर्षांचे मुख्यमंत्री व अशोक चव्हाण यांना होती, असा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. आपल्या आदर्श कारभारामुळे अशोक पर्व चमकले पण मराठा पर्व आपण अंधारात ठेवले, असा टोलाही त्यांनी लगावला. 

मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं? 

विरोधी पक्षनेते तुमचे लक्ष नाही

यापुढे कुणालाही अनधिकृत बांधकामं करता येणार नाही

बांधकामांवर कारवाई होईलच, पण दोषींवर कारवाई करून त्यांना जेलमध्ये जावे लागेल

अमिन पटेल तुम्ही कोविडवर बोलायला पाहिजे होतं

मुंबईकर आणि आम्ही विसरलो नाही, जे प्रकार झाले त्यावर हसावे की रडावे हा प्रश्न


हा प्रकार आणि व्यवहार पाहून मुंबईकर चीड आल्याशिवाय राहणार नाही

हा भ्रष्टाचार म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार आहे

योगेश सागर

कारवाई होणार

मुख्यमंत्री

आता लगेच नाही सांगणार, चौकशी बाकी आहे
भीतीच्या वातावरणात लोक जगच असताना पैसे लुटण्याचा प्रकार सुरु होता
कफनचोर, खिचडी चोर असा बिरुद देखील कमी पडतील
असा भ्रष्टाचार झाला आहे
ऑक्सिजन प्लांट मध्ये ही भ्रष्टाचार
जे रुग्णांना जीवदान देण्याचे काम करत होते
मी नावे घेणार नव्हतो
काही लोकांच्या कृपेने युपीतील हाय वे कंस्ट्रक्शन कंपनीला कामे दिली
काही नावे मी वगळली आहेत
त्याच्यात काय झाले आहे
आदित्य राजाच्या कृपेने वरुन राजाच्या टेंडरचा पाऊस पडला आहे
रोमिन छेडा हा त्याचा प्यादा आहे
सुरुवातीला जिजामाता उद्यानातील पेंग्विन कक्षा पासून झाली
हायवे बांधणाऱ्या कंपनीला पेंग्विन कक्षाचे काम दिले
पेंग्विन पाठोपाठ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कामही दिले

नितेश राणे आदित्य ठाकरेंची मिमिक्री करत आहेत

देवेंद्र फडणवीस यांनी हात करुन शांत बसायला सांगितले

 हे रेकॉर्डवर आहे
कपड्यांचा दुकान होते

टेंडर मिळाले की पैसे खात्यात वळवले
 

पैशांसाठी लोकांच्या जीवाशी खेळायचे

थोडा तरी विचार करण्याची आवश्यकता होती

60 कोटींचे काम जुलैपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते, ते ऑक्टोबर पर्यंत झाले

 ऑगस्ट पर्यंत काम झाले दाखवत ३ कोटींचा दंड ठोठावला

9 कोटी दंड आकारणे अपेक्षित होते

 ऑगस्ट मध्ये बोगस कागदपत्रे दाखवत काम पूर्ण झाल्याचे दाखवले
याच दाखल्याच्या आधारे 80 कोटींचे काम दिले

 ज्या कथा आहेत, त्या अचंबित करणाऱ्या आहेत

 रोबोटिक झू, प्रशासकीय कारवाई, लांडगे, कोल्हे, बिबट्या, तरस, पक्षाचे पिंजरे अशी सर्व कामे देण्यात आली

पेंग्विन कक्ष निगा व देखभालीसाठी काम देण्यात आले

 एकही मालिक आहे,  सब का मालिक एक

अनेकदा एक एक महिन्याचे काम दाखवून सातत्याने काम दिले
या कंपनीला नंतर महापालिका शाळांत वॉटर प्युरिफायर पुरवण्याचे काम दिले

फिल्टर पंप, आणि अनेक कामे दिली

 जुहू रुग्णालयात हाऊस कीपिंग काम दिले

 वर्षा ताई हे सर्व रेकॉर्ड वर आहे

बाळासाहेब ट्रॉमा रुग्णालयात काम दिले

हे कमी की काय महापालिका रुग्णालयात एसी चे काम दिले

वर्सेटाईल कि मल्टी पर्पज म्हणायचे

ही कंपनी काय काय करते याची जंत्री फार मोठा आहे

 माझे डोके गरगरायला लागले आहे

 हे वाचून ही लोक कुठल्या थराला गेले, याचा अंदाज येतोय

रोज तुम्ही आमच्यावर आरोप करणार, रोज शिव्या घालणार

 हे सर्व विथ प्रुफ बाहेर येणार आहे

गॅस सिलेंडर गंजलेल्यामुळे

 ब्लॅक फंगसचा प्रादुर्भाव हे सुद्धा डॉक्टरने रेकॉर्ड वर आणले आहे

काही लोकांचा जीव गेला आहे, जिथे टेंडर तिथे सिलेंडर

सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी

रस्ते बनवणाऱ्या कंपनीला कंत्राटे देत या लोकांनी आरोग्य व्यवस्थेला रस्त्यावर आणले आहे

 सुजित पाटकर यांच्या कंपनीद्वारे बोगस रुग्ण व औषध दाखवली

 महापालिका तिजोरीवर दरोडा घालण्याचे काम केले आहे

मी वाचले आहे, म्हणून बोलत आहे

 या लुटलेल्या दौलतीमधून कुणी घरे भरली

आरोप करताना विचार करा, नाहीतर याहून अधिक पोथडीत आहे

आरोग्य व्यवस्था रस्त्यावर असताना घरी बसणाऱ्यांनी देशात एक नंबरचा सीएम आहे हे दाखवू नये

 घरात बसून एक नंबर कसे होतात

तो नंबर पुढून नाही, तर पाठून होता

 

३०० ग्राम ऐवजी १०० ग्राम खिचडी दिली

 गोरगरिबांच्या तोंडातील २०० ग्राम खिचडीचा घास हिरावून स्वतः ची तुंबडी भरली

 कुणाच्या खात्यात किती पैसे हे उघड झाले आहे

ते बाहेर येईल

सह्याद्री रिफ्रेशमेंट हे कदम व पाटकर यांच्याशी संबंधित आहे

पात्रतेसाठी दाखवलेले किचन हे पर्शियन दरबार हॉटेलच्या मालकाचे होते

त्या मालकाला पत्ताच नाही की आपले किचन खिचडी साठी दाखवले आहे

त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे

अरेबियन नाईट्ससह पर्शियन नाईट्सच्या  सुरस कथा पुढे आल्या आहेत

 माणसं मरत होती, तिकडे नोटा मोजत होते

वैद्यकीय विभागाचे प्रमुख यांना महापौर बंगल्यावर बोलावून कंत्राट खाजगी लॅबला द्यायला सांगितले

युवा नेत्याचा मित्र असलेला पुण्यवान याला काम द्यायला सांगितले

40 हजार इंजेक्शन पुरवण्याचे काम दिले

31 हजार इंजेक्शन पुरवल्या नंतर प्रत्येकी 1568 रुपये दराने कंत्राट दिले

 नवी मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर या महापालिकांनी त्याच कंपनी कडून 650 रुपये दराने घेतल्या

मग इथेच का 1568 रुपये लागले
6 कोटींचा डल्ला मारला
फक्त ही कलाकारी कुणी केली हे माहिती
बुस्टर डोस कुणी दिला हे तपासात समोर येईल

धारावीच्या पुनर्विकास सुरु
मुंबईत मोर्चा निघाला
घोटाळा म्हणजे काय
निविदा काढून अतिरिक्त रक्कम दिली, त्याला घोटाळा म्हणतात
निविदेच्या अटी कायम ठेवणे हा घोटाळा नसतो
कोरफड बॅगची रक्कम वाढवणे म्हणजे घोटाळा
घरे देणे म्हणजे घोटाळा नाही
धारावीचे शेजारी म्हणता मग ग्लोबल टेंडर होते, तर इतर कंपन्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे होते
या पूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द करून तुम्ही
तुम्ही का रद्द केली? हा प्रकल्प रखडवण्याचे काम सुरु आहे
वर्षा ताईंना पण वाटते
हा प्रकल्प झाला पाहिजे
पूर्वी ची निविदा प्रक्रिया रद्द का केली? 
हा प्रकल्प विषिष्ट माणसाला मिळावा असे प्रयत्न होते
पण कायबिनसल
सेटलमेंट तुटले की काय, असे कुणीतरी सांगितले
 मग आरोपीच्या पिंजऱ्यात सरकारला उभे करू नका

 सरकारने निविदा प्रक्रिया राबवताना एकही अट बदलली नाही
ही सर्व प्रक्रिया पारदर्शक पणे राबविण्यात आली
योग्यवेळी काही गोष्टी बाहेर येतील
 धारावी प्रकल्पात टीडीआर संबंधित तरतुदी पारदर्शक आहेत
 १० लाख लोक राहतात, ६०० एकरचा  परिसर आहे
गटारे, टॉयलेट पाहिले
या विशिष्ट जागेसाठी विशिष्ट सवलत द्यावी लागेल
 तेव्हाच हा प्रकल्प होईल
विकास नियंत्रण नियमावलीत प्राथमिक अधिसूचना केली आहे
अजून निर्णय घेतला नाही
आरोप करण्याआधी प्रकल्पाचे स्टेट्स काय जाणुन घ्या
मोर्चा काढण्याऐवजी कायदेशीर प्रक्रियेत सामील होण्याची संधी होती

मातोश्री १ त् मातोश्री २ असा आपला अभिमानास्पद प्रवास झाला
तसा धारावी करांचा धारावी १ त् धारावी २ असा प्रयत्न झाला पाहिजे
त्यांना हक्काचे घर मिळू द्या
एसआरए मध्ये तळमजल्याला घर मिळते
इथे सर्व मजल्यांवर राहणीऱ्या लोकांना घरे मिळणार
अपात्र लोकांनाही घरे देण्यात येणार
टीडीआर चा विषय आहे
फनेल झोन असल्याने टीडीआर विकल्या शिवाय हा प्रकल्प होणार नाही
४० टक्के टीडीआर दिला नाही तर दुसरीकडून घेता येईल

(लोढा जी बरोबर आहे ना?)
 लोकांना जर कळाले की हा मोर्चा कशासाठी काढला जातो
तर हा मोर्चा उलटा फिरू शकतो
जगतातील लोक पाहायला आले पाहिजे
की धारावीचा विकास कसा झाला

काही लोक तडजोड झाली नाही तर मोर्चा काढतात
चाहिए खर्चा निकालो मोर्चा
ज्याच्या विरोधात मोर्चा काढला मते ही स्टेजवर होता


- आपण रस्ते आणि गटारे टाॅयलेट स्वच्छ करण्याच काम सुरु आहे
- ⁠रस्ते पाण्याने धुवण्यचे आदेश दिलेले आहेत
- ⁠या मोहीमेत स्वता मी मुख्यमंत्री जरी असलो तरी जातोय
- ⁠मी स्वता माॅनिटर घृत आहे
- ⁠प्रदुषण आणि खड्डेमुक्त करायाच आहे
- ⁠खडयावर गाण लिहीली होती मात्र यावर्षी खड्डा नाही त्यामुळे गाणी लिहीली नाही
- ⁠मुंबई प्रमाणे सर्व शहर स्वच्छ ठेवायची आहेत
- ⁠मोदी यांनी सुरु केल्यानंतर काही ना टिका केली की हे फोटो सेशन आहे
- ⁠मात्र त्याच आता परिणाम पाहायला मिळेस
- ⁠काही जण मिहणाले की रस्ते साफ करतात 
- ⁠होय रस्ते साफ करतोय तिजोरी साफ करत नाही
- ⁠कारवाई करतोय म्हणुन अंमली पदार्थ साठा सापडत आहे
- ⁠मागील सरकार कारवाई करत नव्हते म्हणून साठे सापडत नव्हते
- ⁠साटलोट होतं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन; पोलीस अधीक्षकांनी स्टार्ट टू एन्ड सगळंच सांगितलं!
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन; पोलीस अधीक्षकांनी स्टार्ट टू एन्ड सगळंच सांगितलं!
Himani Narwal : हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेसच्या युवा महिला नेत्याचा सुटकेसमध्ये मृतदेह सापडला; आरोपी सापडताच धक्कादायक माहिती समोर
हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेसच्या युवा महिला नेत्याचा सुटकेसमध्ये मृतदेह सापडला; आरोपी सापडताच धक्कादायक माहिती समोर
Nandurbar Crime : शेतीचा जुना वाद टोकाला, कुऱ्हाडीचे घाव घालून मजुराला संपवलं; नंदुरबार हादरलं!
शेतीचा जुना वाद टोकाला, कुऱ्हाडीचे घाव घालून मजुराला संपवलं; नंदुरबार हादरलं!
Virar News : धक्कादायक! चक्क नाल्यात आधार कार्डचा खच; नोकरीच्या पत्रांचाही समावेश, नागरिकांच्या स्वप्नांशी आणि भावनांशी खेळ 
धक्कादायक! चक्क नाल्यात आधार कार्डचा खच; नोकरीच्या पत्रांचाही समावेश, नागरिकांच्या स्वप्नांशी आणि भावनांशी खेळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aditi Tatkare On Ladki Bahin:8मार्चच्या महिला दिनाच्या पूर्वसंधेला मिळणार फेब्रुवारी महिन्याचा हप्ताTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 03 March 2025 : ABP MajhaManoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात उपचारासाठी दाखलCity 60 News : 03 March 2025 : सिटी सिक्स्टी सुपरफास्ट बातम्या : 03 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन; पोलीस अधीक्षकांनी स्टार्ट टू एन्ड सगळंच सांगितलं!
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणात चार जण ताब्यात, एक अल्पवयीन; पोलीस अधीक्षकांनी स्टार्ट टू एन्ड सगळंच सांगितलं!
Himani Narwal : हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेसच्या युवा महिला नेत्याचा सुटकेसमध्ये मृतदेह सापडला; आरोपी सापडताच धक्कादायक माहिती समोर
हातावर मेहंदी, गळ्याला ओढणी अन् नाकातून रक्त, काँग्रेसच्या युवा महिला नेत्याचा सुटकेसमध्ये मृतदेह सापडला; आरोपी सापडताच धक्कादायक माहिती समोर
Nandurbar Crime : शेतीचा जुना वाद टोकाला, कुऱ्हाडीचे घाव घालून मजुराला संपवलं; नंदुरबार हादरलं!
शेतीचा जुना वाद टोकाला, कुऱ्हाडीचे घाव घालून मजुराला संपवलं; नंदुरबार हादरलं!
Virar News : धक्कादायक! चक्क नाल्यात आधार कार्डचा खच; नोकरीच्या पत्रांचाही समावेश, नागरिकांच्या स्वप्नांशी आणि भावनांशी खेळ 
धक्कादायक! चक्क नाल्यात आधार कार्डचा खच; नोकरीच्या पत्रांचाही समावेश, नागरिकांच्या स्वप्नांशी आणि भावनांशी खेळ
विधानपरिषदेत गटनेतेपदी फेरनिवड होताच काँग्रेसकडून आणखी एका पदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा
विधानपरिषदेत गटनेतेपदी फेरनिवड होताच काँग्रेसकडून आणखी एका पदासाठी सतेज पाटलांच्या नावाची चर्चा
Raksha Khadse : लेकीची छेड, रक्षा खडसेंचा संताप, आरोपींचे फोटो अन् ऑडिओ क्लीप व्हायरल, तिघांना बेड्या, छेडछाड प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?
लेकीची छेड, रक्षा खडसेंचा संताप, आरोपींचे फोटो अन् ऑडिओ क्लीप व्हायरल, तिघांना बेड्या, छेडछाड प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?
Dhananjay Munde Resignation: धनंजय मुंडे फडणवीसांना भेटले, 15 मिनिटांत बाहेर पडले, राजीनाम्याचा निर्णय आजच होणार?
धनंजय मुंडे फडणवीसांना भेटले, 15 मिनिटांत बाहेर पडले, राजीनाम्याचा निर्णय आजच होणार?
Sandeep Kshirsagar: किमान आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा कडाडले; म्हणाले... 
किमान आता तरी नैतिकता दाखवून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा; आमदार संदीप क्षीरसागर पुन्हा कडाडले; म्हणाले... 
Embed widget