एक्स्प्लोर

मोठी बातमी : भागवत कराडांच्या भेटीगाठी वाढताच भुमरेंसह शिवसैनिक शिंदेंच्या भेटीला; संभाजीनगरचा तिढा कायम

Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री शिंदे आणि संदिपान भुमरे यांच्या शिष्टमंडळात संभाजीनगरच्या जागेवरून चर्चा देखील झाल्याची माहिती मिळत आहे.

Lok Sabha Election 2024 : महायुतीमधील छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) जागेचा तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. कारण भाजपकडून (BJP) इच्छुक असलेले भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या भेटीगाठी वाढताच, शिंदे गटाकडून इच्छुक असलेल्या मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्यासह शिवसैनिकांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि संदिपान भुमरे यांच्या शिष्टमंडळात संभाजीनगरच्या जागेवरून चर्चा देखील झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे महायुतीमधील संभाजीनगरचा तिढा आणखीनच वाढण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मंत्री भागवत कराड छत्रपती संभाजीनगरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. यासाठी मागील तीन-चार दिवसांपासून कराड हे सतत महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवारांची देखील त्यांनी भेट घेतली. भागवत कराड यांच्या भेटीगाठी वाढल्याने आता शिंदे गटाने देखील मुंबई गाठून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती मिळत आहे. शिंदे गटाकडून इच्छुक असलेले मंत्री संदिपान भुमरे स्वतः मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी मुंबईत पोहोचल्याचे पाहायला मिळाले. 

भुमरेंच्या शिष्टमंडळात यांचा सहभाग....

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संदिपान भुमरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. यावेळी संभाजीनगरच्या जागेवरून देखील चर्चा झाली. यावेळी भुमरे यांच्यासह वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमदार रमेशजी बोरनारे, संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट, संभाजीनगर मध्य मतदारसंघाचे आमदार प्रदीपजी जैस्वाल, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ,रमेश पवार उपास्थित होते.

शिंदेसेना आणि भाजपात रस्सीखेच...

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे अनेक नेते आग्रही आहेत. स्वतः अमित शहा यांनी संभाजीनगरमधील सभेत अप्रत्यक्षपणे संभाजीनगरची जागा लढवण्याबाबत वक्तव्य केले होते. मात्र, दुसरीकडे शिवसेना-भाजप युतीत आत्तापर्यंत संभाजीनगर मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला असल्याने या जागेवर शिंदे सेनेकडून देखील दावा केला जातोय. दोन्हीही पक्षाचे नेते आपला हट्ट सोडायला तयार नसल्याने संभाजीनगर मतदारसंघाचा तिढा सुटता सुटत नसल्याची चर्चा आहे.

ठाकरे गटातील वाद मिटला....

एकीकडे महायुतीमधील; संभाजीनगरचा वाद मिटत नसल्याचे चित्र असतांना, दुसरीकडे ठाकरे गटातील अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद मिटला आहे. स्वतः दानवे यांनी खैरे यांच्या निवासस्थानी जाऊन उमेदवारी मिळाल्याने अभिनंदन केले आहेत. तसेच खैरे यांना पेढा भरवत शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत.  त्यामुळे आता महायुतीमधील तिढा कधी सुटणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Bhagwat Karad : उमेदवारीसाठी भागवत कराडांची धावाधाव, महायुतीमधील पक्षांच्या नेत्यांची घेतायत भेटीगाठी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
Mumbai Motilal Nagar redevelopment: गोरेगावच्या मोतीलाल पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाची 36000 कोटींची बोली, 143 एकरांचा प्रोजेक्ट अदानींना मिळाला
मुंबईतील आणखी एक मोठा पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळाला, 36000 कोटींची बोली
'क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ हैं?'; एअरटेल गॅलरीत मराठीतून न बोलण्यासाठी तरूणीची मुजोरी, VIDEO
'क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ हैं?'; मुंबईतील एअरटेल गॅलरीत मराठीतून न बोलण्यासाठी तरूणीची मुजोरी, VIDEO
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 March 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : 12 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : ABP Majha : Maharashtra NewsABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 12 March 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
उन्हाचा चटका वाढला, बहुतांश जिल्ह्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा;राज्यात हवामानाचा अंदाज काय?
Mumbai Motilal Nagar redevelopment: गोरेगावच्या मोतीलाल पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानी समूहाची 36000 कोटींची बोली, 143 एकरांचा प्रोजेक्ट अदानींना मिळाला
मुंबईतील आणखी एक मोठा पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला मिळाला, 36000 कोटींची बोली
'क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ हैं?'; एअरटेल गॅलरीत मराठीतून न बोलण्यासाठी तरूणीची मुजोरी, VIDEO
'क्यू मराठी आणा चाहिए? कहा लिखा हुआ हैं?'; मुंबईतील एअरटेल गॅलरीत मराठीतून न बोलण्यासाठी तरूणीची मुजोरी, VIDEO
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
सावधान! होळी, रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर, 12 मार्च ते 18 मार्चदरम्यान नियम लागू 
Mutual Fund : इंडसइंड बँकेचा शेअर 27 टक्क्यांनी गडगडला, लोअर सर्किट लागताच म्युच्युअल फंडांचे 7300 कोटी बुडाले, यादी समोर
इंडसइंड बँकेच्या शेअरला लोअर सर्किट, स्टॉकमध्ये 27 टक्क्यांची घसरण, म्युच्युअल फंडांचे 7300 कोटी बुडाले
IndusInd Bank : इंडसइंड बँकेचा शेअर गडगडला,  बाजारमूल्य तब्बल 19000 कोटींनी घटलं, गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार? 
इंडसइंड बँकेचा शेअर गडगडला, लोअर सर्किट लागताच बाजारमूल्य 19000 कोटींनी घटलं, आज काय होणार?
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
राजेsss महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर, शिवाजी महाराजांची 6 फूट उंच मूर्ती; मुख्यमंत्री अन् उदयनराजेंच्याहस्ते लोकार्पण
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
स्वारगेट बसमधील बलात्कार घटनेचा अहवाला आला, मंत्री प्रताप सरनाईकांनी विधानसभेत सांगितला
Embed widget