एक्स्प्लोर

जो महाराष्ट्राचं भलं करतो, त्याला काहीही होणार नाही : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री

अमरावती : जो सदैव महाराष्ट्राचे हित चिंततो, त्याला काहीही होणार नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री सरिता फडणवीस यांनी दिली आहे. निलंग्यात मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातानंतर एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह त्या मुलाखतीत बोलत होत्या. दोन दिवसांपूर्वी निलंग्यात मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. या दुर्घटनेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुखरुप बचावले. सुदैवानं मोठा अनर्थ होता-होता टळला. या अपघातानंतर राज्याचा गाडा हाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या आई सरिता फडणवीस यांना काय वाटतं हेच आम्ही जाणून घेतलं. प्रश्न : मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर कोसळल्याची माहीती तुम्हाला सर्वात आधी कोणाकडून मिळाली, आणि त्यावर तुमची काय प्रतिक्रिया होती? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती, त्यांनीच स्वत: दिली. यानंतर त्यांनीच स्वत: आपण सर्व सुखरुप असल्याबद्दलही सांगितलं. पण फक्त तुम्ही कुणी टीव्ही पाहू नका, अशी सूचना केली. कारण त्यासंबंधी बातम्या रंजकतेतनं दाखवल्या जातील अशं त्यांचं म्हणणं होतं. पण यावर मी त्याला विचारलं की ते ठिक आहे. तुम्ही खरंच ठिक आहात ना? त्यावर त्यांनीच सांगितलं की, हो मी ठिक आहे. आम्हाला कसलीही इजा झाली नाही. मी 4 ते 4.30 पर्यंत येतो. त्यानंतर तू स्वत: पाहा. प्रश्न : या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची भीती वाटते का? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : मुळीच नाही..! कारण दौरे हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे त्याची भीती अजिबात वाटत नाही. अन् ज्या माणसाला दिवसाचे 24 तास पूरत नाहीत. त्याला अशा दौऱ्यांसाठी रस्ते मार्गे प्रवास करणं शक्य नाही. त्यामुळे त्यांना अशी अडवणूक करता येणार नाही. पण मी एक सांगते 'देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीप्रमाणे, महाराष्ट्रातल्या जनतेच्या भल्याचाच सदैव विचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काहीही होणार नाही. याची अम्हाला सदैन खात्री आहे. प्रश्न : पण या घटनेनंतर तुम्ही त्यांना काही सल्ला दिला का? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : नाही.. मुख्यमंत्र्यांना मी असा काही सल्ला दिला नाही. पण एक आई म्हणून माझ्या समाधाना करता त्यांना काही गोष्टी सांगत असते, आणि तेही त्यावर सकारात्मक उत्तरं देतात. प्रश्न : मुख्यमंत्री निलंग्यावरुन घरी परत आल्यावर त्यांनी काय सांगितलं? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : ते म्हणाले की, बघं मी सुखरुप परत आलो आहे. पण त्यावर मी विचारलं इतर सर्वही सुखरुप आहेत का त्यावर ते ही म्हणाले की, हो.. इतरही सर्व सुखरुप आहेत केवळ, केतन पाठक यांना थोडसं लागलं आहे. बाकी अम्हाला काही कुणाला लागलं नाही. आम्ही सगळी ठिक आहोत. प्रश्न : गडचिरोली मध्येही असाच प्रकार घडला होता त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया होती? मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री : हो.. तेव्हाचं मला काही नीटसं समजलं नव्हतं. पण त्यानंतर त्यांनी अनेक दौरे केले. पण त्यादरम्यान काही भीती वाटली नाही. किंवा त्रासही झाला नाही. पण एकाच गोष्टीची खंत वाटते की, जो व्यक्ती लोकांसाठी एवढा झिजतो आहे, स्वत: च्या जीवाला त्रास करुन घेत आहे. 45 अंश सेल्सिअस तापमानात स्वत: फिरतो आहे, पण इतकं चांगलं काम करत असताना ही आपल्या मुलाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो, हे पाहून मला त्रास होतो. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रींची विस्तृत मुलाखत पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जुलै 2026 | रविवार
Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती
Gunaratna Sadavarte on Mumbai Tiranga Rally: ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Embed widget