एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दुष्काळ निवारणाच्या अंमलबजावणीसाठी पालक सचिवांना जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे.
मुंबई : राज्यातील दुष्काळ निवारण आणि टंचाई आराखड्याची अंमलबजावणीसाठी पालक सचिवांना जिल्हा दौरे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच पालक सचिवांनी जिल्हा दौरे करुन 21 मे पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे.
तसेच राज्यातील दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळावर मात करण्यासाठी राज्य प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या बाबींचे 48 तासात निराकरण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनास आदेश दिले.
टँकर, चारा छावण्यांची मागणी, रोहयो कामाविषयक स्थिती, जनावरांना चारा, पाणी, दुष्काळी अनुदान, पीक विमा यासारख्या दुष्काळाशी संबंधित बाबी, तक्रारी, मागण्या आणि अडचणी या क्रमांकावर पाठवाव्यात त्या थेट माझ्यापर्यंत पोहोचणार आहेत असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement