एक्स्प्लोर
चक्रव्यूह भेदून बाहेर पडेन! विजय आमचाच : मुख्यमंत्री
मुंबई : महापालिका निवडणुकांनंतर शिवसेनेसोबत जाण्याची गरज पडणार नाही. कुणी कितीही टीका करो, विजय आमचाच आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. 'माझा कट्टा'वर मुख्यमंत्र्यांनी अनेक विषयांवर मनमोकळ्या गप्पा केल्या. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. पारदर्शकतेच्या मुद्द्यामुळे युती शिवसेनेलाच मान्य नव्हती, असा आरोपही त्यांनी केला.
''पाच वर्षे मीच मुख्यमंत्री राहणार''
निवडणुकांनंतरही शिवसेना पाठिंबा काढणार नाही, पाच वर्षे युतीचं सरकार राहिल आणि मीच मुख्यमंत्री राहिल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सरकार नोटीसवर आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. शिवसेनेच्या नोटिशीला मी अजून 'नोटीस' केलेलं नाही, असा टोला त्यांनी लगावला. अभिमन्यूला चक्रव्यूह भेदून कसं जायचं माहित नव्हतं, पण मला हे चक्रव्यूह कसं भेदायचं त्याचा अभ्यास केलेला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
''शेतकऱ्यांना कर्जमाफीऐवजी सक्षम बनवण्यासाठी उपाय योजना''
सरकार कर्जमाफीच्या विरोधात नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मात्र कर्जमाफीनंतर शेतकरी वारंवार कर्जबाजारी होत आहे. त्यामुळ केवळ बँकांचंच भलं होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी विविध योजना आणल्या जात आहे. ज्यामुळे पुन्हा कर्ज घेण्याची वेळ येणार नाही. शेतीमध्ये गुंतवणूक आणण्याची सरकारची योजना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
''घोटाळे असतील तर मांडावेच लागतील''
मुंबई महापालिकेच्या कारभारावरुन मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला जोरदार केलं. घोटाळे असतील तर ते मांडावेच लागतील, असं यावेळी ते म्हणाले. महापालिकेत भाजपही शिवसेनेसोबत आहे. मात्र या काळात अनेक प्रस्तावांना भाजपने विरोध केला. पण शिवसेनेने इतर पक्षांच्या पाठिंब्याने तो प्रस्ताव मान्य केला, असं मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान केंद्राचा अहवाल उद्धव ठाकरेंनी नीट वाचला नाही, त्यामुळे ते पारदर्शीपणाबद्दल बोलत आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंच्या सल्लागाराने चुकीची माहिती दिल्यामुळे त्यांचा गैरसमज झाला, असं ते म्हणाले.
''कल्याण-डोंबिवलीसाठी 6500 कोटी देणार बोललोच नव्हतो''
कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी 6500 कोटी देणार अशी घोषणा केलीच नव्हती, तर योजनांच्या माध्यमातून हा पैसा आणू, असं आपण बोललो होतो, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 6500 कोटी सोडा, पण 14 हजार कोटींची मेट्रो कल्याण-डोंबिवलीमध्ये आणली, असंही सांगायला ते विसरले नाहीत.
माझा कट्टावरील महत्वाचे मुद्दे:
चक्रव्यूह भेदून बाहेर जाणं मला जमतं: मुख्यमंत्री
मला हरण्याची भीती नाही, आजवर कधी हरलो नाही: मुख्यमंत्री
90 ते 93 टक्के पक्षाच्या लोकांना जागा दिल्या, बाहेरच्या लोकांना फार कमी जागा दिल्या: मुख्यमंत्री
गुंडांना भाजपप्रवेश हा आरोप चुकीचा: मुख्यमंत्री
चूक झाली असेल तर नक्कीच सुधारु: मुख्यमंत्री
ओमी कलानीला आम्ही पक्षात घेतलेलं नाही, तिथं स्थानिक आघाडी आहे. त्याचा तो उमेदवार आहे, आमचा नाही: मुख्यमंत्री
मी नागपूरचा आहे, आमच्याकडे औकात हा शब्द चांगला म्हणून वापरला जातो: मुख्यमंत्री
असंस्कृत असतो तर त्यांची औकात काय ते दाखवू असं म्हणालो असतो, पण मी आमची औकात काय ते म्हणाले: मुख्यमंत्री
अजित पवारांशी माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत: मुख्यमंत्री
माझी खुर्ची जाणार नाही, पाच वर्ष मीच मुख्यमंत्री असणार आहे: मुख्यमंत्री
आमचंच सरकार येणार, आमचाच महापौर येणार...राजकारणात विश्वासानं पुढं जायचं असतं: मुख्यमंत्री
वैचारिकदृष्ट्या शिवसेना आमच्या जवळची, राजकीय विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस: मुख्यमंत्री
अजून तरी सरकार पडणार नाही, जर वेळ आलीच तर... देखिये आगे-आगे होता है क्या: मुख्यमंत्री
माझ्या भाषणात मी कुणावरही वैयक्तिक टीका करत नाही: मुख्यमंत्री
शिवसेनेकडून पाच-दहा जागा कमी मिळाल्या तरी आम्हाला चाललं असतं: मुख्यमंत्री
पण भाजपच्या पारदर्शकतेचा अजेंडा शिवसेनेला मान्य नव्हता, म्हणून त्यांनी युती तोडली: मुख्यमंत्री
घोटाळे असतील तर ते मांडावे लागतीलच: मुख्यमंत्री
कोणताही पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत नाही: मुख्यमंत्री
भाजपमध्ये 90 टक्के तिकीटं निष्ठावंतांना दिली, बाहेरुन आलेल्यांना केवळ 10 टक्के : मुख्यमंत्री
पारदर्शकता हा वाजपेयींनी आणलेला अजेंडा आहे, त्यावरच आम्ही चालतोय : मुख्यमंत्री
नाशिकच्या पवन पवारला पक्षातून काढण्याची नाशिक भाजपला नोटीस दिली : मुख्यमंत्री
उमेदवार चुकीचा असेल तर त्याला निवडून देऊ नये : मुख्यमंत्री
भाजपमध्ये मोदींपासून सर्वांपर्यंत बाळासाहेबांविषयी आदर : मुख्यमंत्री
कर्जमाफीला विरोध नाही, पण कर्ज फेडण्याची शेतकऱ्याची ऐपत झाली पाहिजे, त्यासाठी योजना आणत आहोत : मुख्यमंत्री
शेतकऱ्याला सक्षम करुन कर्जमाफी करण्याची योजना : मुख्यमंत्री
राजू शेट्टींचं दुखणं वेगळं आहे, ते आता सांगता येणार नाही : मुख्यमंत्री
मराठी माणसाच्या नावावर मोठं होणारे अनेक लोक आहेत : मुख्यमंत्री
कल्याण-डोंबिवलीला 6500 कोटी देणार असं बोललो नाही, फक्त योजनांची माहिती दिली : मुख्यमंत्री
सुप्रियाताईं जेव्हा मला चिडक्या म्हणाला तेव्हा माझ्या बायकोला आनंद झाला, मी चिडतो असं तिला कधी वाटायचं नाही: मुख्यमंत्री
23 तारखेला कळेलच फायदा कुणाला, नुकसान कुणाला... : मुख्यमंत्री
संबंधित बातम्या:
‘साहेब संपत्ती घोषित करणार का?’, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यांमुळे ठाण्याची संख्या रोज वाढतीये : राज ठाकरे
... तर मग मुख्यमंत्री, पंतप्रधानांच्या तोंडालाही बूच मारा : उद्धव ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement