एक्स्प्लोर
Advertisement
शिक्षक-पोलिसांची धुमश्चक्री, मुख्यमंत्री पार्टी झोडण्यात दंग
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये शिक्षक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पार्टीमध्ये दंग होते. जखमी पोलीस आणि शिक्षकांना भेट देण्याचं साधं सौजन्यही मुख्यमंत्र्यांनी दाखवलं नसल्याचा आरोप होत आहे.
मराठवाड्याच्या प्रश्नावर औरंगाबादमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यावेळी शिक्षक आणि पोलिसात तुफान हाणामारी झाली. पण हे सगळं सुरु असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप आमदार अतुल सावेंच्या घरी मेजवानी झोडत होते.
विनाअनुदानित शाळांना अनुदान द्या, या मागणीसाठी औरंगाबादेत शिक्षकांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलक शिक्षकांनी पोलिसांवर दगडफेक केली. या गोंधळात नऊ पोलिसांसह काही आंदोलक शिक्षक जखमी झाले.
औरंगाबादेत शिक्षकांच्या मोर्चावर लाठीचार्ज, गोंधळात पोलिसाचा मृत्यू
धक्कादायक म्हणजे यावेळी धावपळीदरम्यान एका पोलिसाचा मृत्यू झाला. मात्र पोलिसाच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. औरंगाबाद सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये आंदोलक शिक्षकांविरोधात दंगल भडकवण्याचा गुन्हा दाखल करण्यात येत होता.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement